भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज संसदेच्या प्रांगणात प्रेरणा स्थळ येथील त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवरांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्ष सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली.
ओम बिर्ला यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या एका संदेशात म्हटले आहे, “आदिवासी अस्मिता आणि संस्कृतीचे अभिमान आणि उलगुलानचे शिल्पकार धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्ष सोहळ्याला आजपासून सुरूवात होत आहे. या आदिवासी गौरव दिनानिमित्त मी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान बिरसा मुंडा हे एक महान नायक होते ज्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्र, समाज आणि संस्कृतीसाठी समर्पित केले. त्यांचे जीवन आणि आदर्श आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील. #BirsaMunda150.”
15 नोव्हेंबर 2024 रोजी संसदेच्या प्रांगणातील प्रेरणा स्थळ येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उप सभापती हरिवंश.
15 नोव्हेंबर 2024 रोजी संसदेच्या प्रांगणातील प्रेरणा स्थळ येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे आदिवासी लोक कलाकारांसमवेत
15 नोव्हेंबर 2024 रोजी संसदेच्या प्रांगणातील प्रेरणा स्थळ येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला.
15 नोव्हेंबर 2024 रोजी संसदेच्या प्रांगणातील प्रेरणा स्थळ येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे आदिवासी लोक कलाकारांसमवेत.