भारताच्या राष्ट्रपती- द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 नोव्हेंबर 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका सोहळ्यात, स्वित्झर्लंड, जॉर्डन, पापुआ न्यू गिनी, दक्षिण आफ्रिका, म्यानमार आणि इजिप्त या देशांच्या राजदूत/ उच्चायुक्तांच्या परिचयपत्रांचा स्वीकार केला. पुढील व्यक्तींनी परिचयपत्रे सादर केली:
1. श्रीमती माया तिसाफी, स्वित्झर्लंडच्या राजदूत.
2. श्री. युसफ मुस्तफा अली अब्देल घनी, जॉर्डनच्या हाश्मी किंग्डमचे राजदूत.
3. श्री.व्हिन्सेंट सुमाले, पापुआ न्यू गिनीचे उच्चायुक्त.
4. श्री. प्रा. अनिल सूकलाल, दक्षिण आफ्रिकी प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त.
5. श्री. झॉ ऊ, म्यानमार संघाच्या प्रजासत्ताकाचे राजदूत.
6. श्री. कामेल झाएद कामेल गलाल, इजिप्तच्या अरब प्रजासत्ताकाचे राजदूत.