शुक्रवार, फ़रवरी 14 2025 | 06:10:48 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / हरित हायड्रोजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी SECI ने सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी

हरित हायड्रोजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी SECI ने सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी

Follow us on:

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) ने हरित हायड्रोजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सहयोगी आराखडा स्थापन करण्याच्या दृष्टीने H2Global Stiftung सह सामंजस्य करार केला आहे.याचा उद्देश बाजारपेठेवर आधारित यंत्रणांबाबत ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे आणि भारत आणि आयातदार देशांमधील सहकार्य वाढवणे, हा आहे, जेणेकरुन हरित हायड्रोजन अर्थव्यवस्थेच्या जागतिक प्रगतीला हातभार लागेल.

या सामंजस्य करारावर  संजय शर्मा-संचालक (सौर), SECI आणि डॉ. सुसाना मोरेरा-कार्यकारी संचालक, H2Global यांनी 19 नोव्हेंबर 2024 रोजी श्री टिमो बॉलर्हे-मुख्य कार्यकारी अधिकारी (HintCo),  मार्कस एक्झेनबर्गर-कार्यकारी संचालक ( एच 2 ग्लोबल फाउंडेशन), यांच्या सन्माननीय उपस्थितीत स्वाक्षरी केली. संचालक प्रशांत कुमार सिंग-सचिव (MNRE), अभय  भाकरे-मिशन डायरेक्टर (एनजीएचएम), डॉ प्रसाद चापेकर-डीएस (एमएनआरई) आणि  के आर ज्योती लाल,-एसीएस केरळ, हे मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते.

हे सहकार्य भारताला संयुक्त निविदा रचना संकल्पनांवर, विशेषत: हरित हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जचे निर्यात केंद्र बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेशी निगडित संयुक्त निविदांची रचना करण्यासाठी काम करण्याची संधी देते.   हे सहकार्य, भारताच्या हरित हायड्रोजन उपक्रमांना पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या व्यापारी मालवाहतूक  आणि भागधारकांच्या सहभागासह जागतिक हायड्रोजन बाजारातील गतिशीलतेबद्दल, मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकते.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ટકાઉપણાને આગળ વધારતા, સી. આર. પાટીલે ગોબરધન પહેલની પ્રગતિની સમીક્ષા કરી

ગોબરધન પહેલની પ્રગતિની સમીક્ષા કરવા માટે એક મહત્વપૂર્ણ પગલું ભરતાં કેન્દ્રીય જલ શક્તિ મંત્રી શ્રી …