सोमवार, नवंबर 25 2024 | 04:11:19 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / प्रसिद्ध नर्तक आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक कनक राजू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

प्रसिद्ध नर्तक आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक कनक राजू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

Follow us on:

देशातील उत्कृष्ट नर्तक आणि भारताचे सांस्कृतिक प्रतिक असलेले कनक राजू जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. गुस्साडी नृत्याचे जतन करण्यासाठी आणि या नृत्याच्या सांस्कृतिक वारशाच्या महत्त्वपूर्ण पैलूंचे त्यांच्या अस्सल स्वरूपात जतन संवर्धन करण्यात कनक राजू यांनी दिलेले समर्पक योगदान आणि उत्कटतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात लिहिले:

“भारतातील प्रसिद्ध नर्तक आणि भारताचे सांस्कृतिक प्रतीक श्री कनक राजू जी, यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले.  गुस्साडी नृत्य जपण्यासाठी त्यांनी दिलेले भरीव योगदान आगामी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील.  त्यांच्या समर्पण आणि उत्कटतेमुळे सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे पैलू त्यांच्या अस्सल स्वरूपात भरभराटीस येतील. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती संवेदना.  ओम शांती.”

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

व्यापार व आर्थिक भागीदारी कराराच्या (टीईपीए) अंमलबजावणीसाठी केंद्रीय वाणिज्य सचिवांची नॉर्वे भेट

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभाग सचिव सुनील बर्थवाल यांच्यासह विभागाच्या अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी …