शुक्रवार, नवंबर 22 2024 | 07:36:01 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

Follow us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरध्वनी द्वारे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी संवाद साधला.

भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन केले.

दोन्ही नेत्यांनी अलीकडील उच्च-स्तरीय देवाणघेवाणीद्वारे द्विपक्षीय संबंधांना आलेल्या गतीची प्रशंसा केली. भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी भारताला दिलेल्या भेटीनंतरच्या घडामोडींचा उभय नेत्यांनी आढावा घेतला. यावेळी व्यापार, संरक्षण, नौवहन आणि संपर्क सुविधा यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

दोन्ही नेत्यांनी आयएमईईसी आणि पश्चिम आशियातील घडामोडी यासह विविध प्रादेशिक आणि जागतिक हितसंबंधांच्या मुद्द्यांवरही विचार विनिमय केला.

यावेळी दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

‘सफरनामा’च्या उद्घाटनाने इफ्फीएस्टा ‘सफर’चा प्रारंभ

55 वा  इफ्फी  अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संगीत कला आणि संस्कृतीला मनोरंजनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी …