भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचे प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स,सी-डॉट आणि सीआर राव एआयएमएससीएस या संस्थेसोबत “साइड चॅनल लीकेज कॅप्चर इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड अॅनालिसीस सोल्युशन’ यांच्या संदर्भात विकास करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.
यात क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम सुरू असताना एफपीजीए कडून रिअल-टाइम पॉवर युसेज चेंजद्वारे साइड चॅनेल डेटा लीकेज कॅप्चर करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास (सॉफ्टवेअर आणि संबंधित हार्डवेअर निर्मितीचा) यात समावेश आहे.
सीआर राव अंकगणित, संख्याशास्त्र आणि कम्प्युटर सायन्स प्रगत संस्था (एआयएमएससीएस),ही संस्था क्रिप्टोग्राफी आणि माहिती सुरक्षा या क्षेत्रांतील प्रगत संशोधन आणि अनुप्रयोग या विषयांवर पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करणारी अशी देशातील एक वैशिष्ट्यपूर्ण पहिली संस्था आहे. आतापर्यंत संस्थेने 380पेक्षा अधिक संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत, अनेक तांत्रिक अहवाल तयार केले आहेत आणि क्रिप्टोलॉजीच्या क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर साधने(टूल्स)ही विकसित केली आहेत.
या निमित्ताने झालेल्या एका समारंभात सी डॉटचे तांत्रिक संचालक, डॉ.पंकज कुमार दलेला,यांनी स्वाक्षरी केली; यावेळी सी.आर. राव एआयएमएससीएस या संस्थेचे प्रमुख गुंतवणूक अधिकारी.श्रीरामुडू आणि वित्त अधिकारी.बी. पांडू रेड्डी, उपस्थित होते.