गुरुवार, नवंबर 14 2024 | 10:47:11 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / पेटंट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाइन्स यामध्ये भारत पहिल्या 10 देशांमध्ये : ‘डब्‍ल्यूआयपीओ 2024’ चा अहवाल

पेटंट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाइन्स यामध्ये भारत पहिल्या 10 देशांमध्ये : ‘डब्‍ल्यूआयपीओ 2024’ चा अहवाल

Follow us on:

जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (डब्‍ल्यूआयपीओ) ने 2024 च्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशकांची (डब्‍ल्यूआयपीआय) यादी प्रकाशित केली असून बौद्धिक संपदा (आयपी) हक्कांसाठी अर्ज दाखल करण्याकडे जगभरात कल वाढत असल्याचे त्याद्वारे अधोरेखित केले आहे.प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये पेटंट म्हणजे बौध्दिक स्वामित्व , व्यवसाय चिन्ह (ट्रेडमार्क) आणि औद्योगिक डिझाइनसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे या अहवालाने दाखवून दिले आहे. पेटंट, व्यवसाय चिन्ह (ट्रेडमार्क) आणि औद्योगिक डिझाइन हे तीनही प्रमुख बौद्धिक संपदा (आयपी) हक्क प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताने जगातील पहिल्या 10 देशांमध्ये स्थान मिळवले आहे.

वर्ष  2018 ते 2023 या कालावधीत, पेटंट आणि औद्योगिक डिझाइनसाठी अर्ज दाखल होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे, तर व्यापारचिन्‍ह  नोंदणीसाठीच्या अर्जांमध्ये 60% वाढ झाली आहे, यामधून आयपी आणि नवोन्मेषावरील देशाचा वाढता भर दिसून येतो. भारताच्या पेटंट-आणि -सकल देशांतर्गत उत्पादन  (जीडीपी) यांच्या गुणोत्तरातही लक्षणीय वाढ दिसून आली असून ते गेल्या दशकातील 144 वरून वाढून 381 वर पोहोचले आहे,ही बाब आर्थिक विस्ताराबरोबरच आयपी  क्रियाकलापांमध्येही वाढ होत असल्याचे दर्शवणारी आहे.

व्यापार चिन्‍हासाठी दाखल झालेल्या अर्जांच्या प्रमाणात 2023 मध्ये 6.1% वाढ झाल्याने जागतिक स्तरावर भारताने चौथा क्रमांक पटकावला आहे. यापैकी जवळपास 90% अर्ज हे देशातील रहिवाशांचे असून त्यामध्ये  आरोग्य (21.9%), कृषी (15.3%) आणि कपडे (12.8%) यासह अन्य प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

“कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी” केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण’ कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल …