सोमवार, नवंबर 18 2024 | 10:01:33 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi (page 12)

marathi

marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (115 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!  ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले  तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे,  जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या …

Read More »

पायदळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व पदांवर कार्यरत असलेल्या तसंच दिग्गजांच्या अदम्य भावनेला आणि धैर्याला केला सलाम

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी पायदळ दिनानिमित्त पायदळातील सर्व पदांवर कार्यरत असलेल्या तसंच दिग्गजांच्या अदम्य भावनेचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले की: “पायदळ दिनानिमित्त, आम्ही  सर्वजण अथकपणे आमचे रक्षण करणाऱ्या पायदळातील सर्व रँक आणि दिग्गजांच्या अदम्य चैतन्यशीलतेला आणि धैर्याला सलाम करतो. आपल्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करून कोणत्याही संकटाचा …

Read More »

सीबीडीटी ने प्राप्तिकर कायदा, 1961 (अधिनियम) अंतर्गत 2024-25 या मूल्यांकन वर्षासाठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत 2024-25 या मुल्यांकन वर्षासाठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची देय तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) च्या स्पष्टीकरण 2 च्या खंड (a) मध्ये संदर्भित करदात्यांसाठी पूर्वी परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 होती. सीबीडीटी ने परिपत्रक क्र.13/2024, F.No.225/205/2024/ITA-II दिनांक 26.10.2024 रोजी जारी केले आहे.  सदर परिपत्रक www.incometaxindia.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Read More »

प्रसिद्ध नर्तक आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक कनक राजू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

देशातील उत्कृष्ट नर्तक आणि भारताचे सांस्कृतिक प्रतिक असलेले कनक राजू जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. गुस्साडी नृत्याचे जतन करण्यासाठी आणि या नृत्याच्या सांस्कृतिक वारशाच्या महत्त्वपूर्ण पैलूंचे त्यांच्या अस्सल स्वरूपात जतन संवर्धन करण्यात कनक राजू यांनी दिलेले समर्पक योगदान आणि उत्कटतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी X या समाज …

Read More »

लोकपालांनी, कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली

लोकपालांनी दिनांक 18 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे,लोकपालांसाठी कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. लोकपालांनी भारताच्या लोकपाल कार्यालयातील कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठी निकष तयार केले आहेत. हे निकष 25 सप्टेंबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे  लोकपालांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर, दिनांक …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत रायपूर एम्सचा दीक्षांत समारंभ संपन्न

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 ऑक्टोबर 2024) रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) दुसऱ्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. कमी खर्चात चांगली आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण देण्याची एम्सची ख्याती आहे. लोकांचा विश्वास एम्सशी निगडित आहे. त्यामुळेच एम्समध्ये उपचार घेण्यासाठी ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक येतात असे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले. …

Read More »

भारत तिबेट सीमा पोलीस दल अर्थात आयटीबीपीच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आयटीबीपी हिमवीरांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तिबेट सीमा पोलीसदलाच्या स्थापनादिनानिमित्त आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक असल्याचे सांगत नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यात या पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांचं हे कार्य लोकांसाठी  अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या …

Read More »

16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या मर्यादित पूर्ण सत्रात पंतप्रधानांचे संबोधन

सन्माननीय महोदय, आजच्या बैठकीच्या दिमाखदार आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे की आज आपण एका विस्तारित ब्रिक्स कुटुंबाच्या रूपात प्रथमच भेटत आहोत.ब्रिक्स परिवाराशी संबंधित सर्व नवीन सदस्य आणि सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. गेल्या वर्षभरात रशियाचे यशस्वी अध्यक्षपद भूषवल्याबद्दल मी अध्यक्ष पुतीन यांचे …

Read More »

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

मी आज रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमिर पुतीन यांच्या निमंत्रणावरून कझान येथे आयोजित 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे. जागतिक विकासाशी निगडित उद्दिष्टे, सुधारित बहुपक्षीयता, हवामान बदल, आर्थिक सहकार्य, लवचिक पुरवठा साखळीची निर्मिती, सांस्कृतिक बंध आणि नागरिकांच्या दृढ संबंधांना चालना देण्यासह अशा अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आणि विचारमंथन करण्यासाठी एक …

Read More »

1993 च्या तुकडीचे एजीएमयुटी केडरचे सनदी अधिकारी विक्रम देव दत्त यांनी कोळसा सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला

विक्रम देव दत्त यांनी आज कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (एजीएमयुटी) कॅडरचे 1993 च्या तुकडीचे सनदी अधिकारी,  विक्रम देव दत्त यांनी यापूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) महासंचालक म्हणून काम केले आहे. याआधीचे कोळसा मंत्रालयाचे सचिव व्ही.एल. कांथा राव यांच्या जागी दत्त यांनी पदभार स्वीकारला …

Read More »