Monday, September 14 2026 | 10:35:58 PM
Breaking News

पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाने (पीएमएमएल) संशोधकांना मिळवून दिली दुर्मिळ अभिलेखीय संग्रहांची दूरस्थ (ऑनलाईन) उपलब्धता

Connect us on:

स्वातंत्र्यापासूनच्या भारताच्या सर्व पंतप्रधानांचा वारसा जपण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी समर्पित असलेल्या, पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (Prime Ministers’ Museum and Library – PMML) या अग्रगण्य राष्ट्रीय संस्थेने, आपल्या प्रचंड अभिलेखीय साधनसामुग्रीपर्यंत पोहोचण्याची व्याप्ती वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पीएमएमएल कडे, 1,300 हून अधिक व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित 25 दशलक्षाहून अधिक दस्तऐवज समाविष्ट असलेला दुर्मिळ अभिलेखीय सामुग्रीचा जगातील सर्वात मोठा संग्रह आहे. आधुनिक आणि समकालीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारे हाडाचे संशोधक आणि विद्वानांकडून या नोंदींचा नियमितपणे संदर्भ घेतला जातो.

एका महत्त्वपूर्ण उपक्रमा अंतर्गत, पीएमएमएल आपल्या दुर्मिळ अभिलेखीय संग्रहाच्या सर्वसमावेशक डिजिटलीकरणाचा (अंकीयकरणाचा) प्रकल्प हाती घेत आहे. यामध्ये वैयक्तिक कागदपत्रे, पत्रव्यवहार, भाषणे, दैनंदिन नोंदी आणि वृत्तपत्रांतील लेख यांचा समावेश आहे. हा थारेपालट घडवून आणणारा प्रयत्न,  जीर्ण- जपून हाताळाव्या लागणाऱ्या दस्तऐवजांचे दीर्घकाळ जतन सुनिश्चित करतो, तसेच अस्सल संशोधन करणाऱ्या विद्वानांसाठी मर्यादित दूरस्थ (ऑनलाईन) उपलब्धता मिळवून देतो. वारंवार वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा मोठा भाग आधीच डिजिटल करण्यात आला आहे, संगणकीय प्रणालीत अपलोड केला आहे आणि नव्याने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला गेला आहे.

या डिजिटल अभिलेखांची दूरस्थ उपलब्धता सहजप्राप्य करण्यासाठी एक समर्पित, माहिती तंत्रज्ञान मंच (‘आयटी प्लॅटफॉर्म’) तयार करण्यात आला आहे. आता नोंदणीकृत विद्वान, विशिष्ट अभिलेखीय दस्तऐवज पाहण्यासाठी पीएमएमएल ला प्रत्यक्ष भेट न देता, ऑनलाइन विनंत्या सादर करू शकतात. विनंती मंजूर झाल्यावर, संबंधित सामग्री विद्वानांच्या डेस्कटॉपवर केवळ पाहण्यासाठी सुरक्षितपणे उपलब्ध करून दिली जाईल.

पीएमएमएल च्या डिजिटल अभिलेख संग्रहाचे हे अनावरण, तंत्रज्ञानाचा उपयोग करून अमूल्य ऐतिहासिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आणि जगभरातील संशोधक, विद्वान तसेच अभ्यासकांसाठी सुलभता वाढवणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

पीएमएमएल चे संचालक अश्वनी लोहाणी यांनी सांगितले की, हा उपक्रम अभिलेखीय सामग्री उपलब्धतेच्या सुलभतेत वाढ करून उच्च-गुणवत्तेच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आधुनिक तसेच समकालीन भारताच्या अभ्यासाला बळ देण्याप्रति संस्थेची अढळ बांधिलकी दर्शवतो.

About Matribhumi Samachar

Check Also

Justice V. Ramasubramanian Chairing NHRC Sitting in Gujarat

NHRC એ ગાંધીનગરમાં યોજી પૂર્ણ આયોગ સુનાવણી: પીડિતોને ₹3.5 કરોડથી વધુનું વળતર અને અનેક કેસોનો સ્થળ પર જ નિકાલ

રાષ્ટ્રીય માનવ અધિકાર આયોગ (NHRC) દ્વારા 2 અને 3 સપ્ટેમ્બર 2026 ના રોજ નેશનલ ફોરેન્સિક …