Monday, December 08 2025 | 06:56:39 AM
Breaking News

ईसीआयनेट हा डिजिटल प्लॅटफॉर्म अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मागवल्या सूचना

Connect us on:

भारतीय निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ईसीआयनेट (ECINet ) ॲप डाउनलोड करण्याचे आणि ॲपवरील ‘सूचना दाखल करा’ हा टॅब वापरून ॲप सुधारण्यासाठी आपल्या सूचना देण्याचे आवाहन केले आहे. हे 27 नोव्हेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 दरम्यान करता येईल.

ईसीआयनेट अ‍ॅपची चाचणी आवृत्ती बिहार विधानसभा निवडणूक 2025 आणि अलिकडच्या पोटनिवडणुकांमध्ये वापरण्यात आली होती. या नवीन प्लॅटफॉर्ममुळे मतदारांना चांगल्या सेवा, मतदानाच्या टक्केवारीची जलद उपलब्धता आणि मतदान संपल्यानंतर 72 तासांच्या आत निर्देशाक पत्रिका प्रकाशित करणे शक्य झाले, या प्रक्रियेसाठी पूर्वी अनेक आठवडे किंवा महिने लागत होते.

बिहार निवडणुकीतील धडे तसेच सीईओ, डीईओ, ईआरओ, निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा समावेश करून प्लॅटफॉर्मची कार्यक्षमता आणखी वाढवली जात आहे.

वापरकर्त्यांच्या सूचना तपासल्या जातील आणि प्लॅटफॉर्म अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवण्यासाठी त्यात आणखी सुधारणा केल्या जातील. ईसीआयनेट प्लॅटफॉर्मचा अधिकृत आरंभ जानेवारी 2026 मध्ये नियोजित आहे.

ईसीआयनेट हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक असून तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे मतदारांना सुधारित सुविधा उपलब्ध करून देणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवणे हा यामागील उद्देश आहे. 04 मे , 2025 रोजी याची जाहीर घोषणा झाल्यानंतर ई अ‍ॅपच्या विकासाचे काम सुरू झाले.

(https://tinyurl.com/3s6bnezr)

ईसीआयनेट अ‍ॅप हे नागरिकांसाठी एक एकीकृत अ‍ॅप आहे जे मतदार हेल्पलाइन अ‍ॅप (VHA), cVIGIL, सक्षम, पोलिंग ट्रेंड्स (व्होटर टर्नआउट अ‍ॅप), नो युअर कॅंडिडेट (KYC) अ‍ॅप यांसारख्या पूर्वीच्या 40 स्वतंत्र निवडणूक-संबंधित अनुप्रयोग/वेबसाइट्सना एकाच इंटरफेसमध्ये एकत्रित करते. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर दोन्हीवरून डाउनलोड करता येते.

About Matribhumi Samachar

Check Also

સમુદ્રરક્ષણ 2.0નું સમાપન, ભારતની દરિયાકાંઠાની સુરક્ષા મજબૂત બની

રાષ્ટ્રીય રક્ષા યુનિવર્સિટી (RRU) ની સ્કૂલ ઓફ ઇન્ટિગ્રેટેડ કોસ્ટલ એન્ડ મેરીટાઇમ સિક્યોરિટી સ્ટડીઝ (SICMSS) એ આજે ભારતીય …