नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025. खेळणी उत्पादन क्षेत्रातील सरकारच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
मन की बात अपडेट्स हॅन्डल वरील एका पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे :
“मन की बात च्या एका भागात आपण खेळणी उत्पादन क्षेत्राला चालना देण्याविषयी आणि त्यासाठी संपूर्ण भारतातून एकत्रित प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेविषयी संवाद साधला होता, त्या दिशेने आपण खूप मोठी कामगिरी केली आहे.
खेळणी उत्पादन क्षेत्रातील आमच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या आमच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

