राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की : “कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या …
Read More »माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने माझडॉक मुंबई 10K चॅलेंजसह 250 वा वर्धापन दिन केला साजरा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने आपल्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त, 15 डिसेंबर 2024 रोजी माझडॉक मुंबई 10K चॅलेंजच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने शहरात चैतन्य निर्माण करत समाजातील सर्व स्तरातील सहभागींना एकत्र आणले आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात खोलवर रुजलेला वारसा अधिक …
Read More »नोव्हेंबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक
नोव्हेंबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर (डब्ल्यूपीआय) नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 1.89% टक्के आहे. महागाईच्या दरात नोव्हेंबर मध्ये नोंदवण्यात आलेली वाढ प्रामुख्याने खाद्य उत्पादने, अन्न उत्पादने, इतर उत्पादने, कापड उत्पादन, यंत्रे आणि उपकरणांचे उत्पादन आदींच्या वाढलेल्या किमतीमुळे आहे. सर्व वस्तू आणि डब्ल्यूपीआय …
Read More »विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शूर सैनिकांना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय दिवसानिमित्त शूर सैनिकांना अभिवादन केले. X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात त्यांनी लिहिले: “आज, विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही 1971 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिलेल्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करत आहोत. त्यांच्या निःस्वार्थ समर्पण आणि अतुट संकल्पाने आपल्या देशाचे रक्षण केले आणि …
Read More »प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय शास्त्रीय संगीतजगात खऱ्या अर्थानं क्रांती घडवणारा प्रतिभावंत म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांनी तबलावादनाला जागतिक स्तरावर ओळख …
Read More »पंतप्रधान 17 डिसेंबरला राजस्थानला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. एक वर्ष-परिणाम उत्कर्ष या राजस्थान सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. यावेळी ते राजस्थानमध्ये जयपूर येथे ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी यांच्याशी संबंधित 46,300 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 24 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान 11,000 कोटी रुपयांपेक्षा …
Read More »आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली
आर्मेनिया प्रजासत्ताकच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (16 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आर्मेनिया प्रजासत्ताकच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एलेन सिमोनियन यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले आहे. शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी भारत आणि आर्मेनिया यांच्यातील शतकानुशतके प्राचीन प्रगाढ सांस्कृतिक बंध आणि लोकशाहीच्या सामायिक मूल्यावर आधारित बहुआयामी समकालीन संबंधांना …
Read More »“विरासत”- भारतातील हाताने विणलेल्या साड्यांचा उत्सव
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे येत्या 15 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत हँडलूम हाट, जनपथ, नवी दिल्ली येथे “विरासत साडी महोत्सव 2024” या भव्य कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे. “विरासत साडी महोत्सव 2024” च्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांतील हातमाग साड्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि देशभरातील हातमाग विणकर, साडी डिझाइनर आणि साडी प्रेमी आणि खरेदीदारांना एकत्र आणण्याचा उद्देश …
Read More »राष्ट्रीय जलमार्ग 1, 2 आणि 16 वर अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘जलवाहक’ योजनेचा केला प्रारंभ
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जलवाहक’ या प्रमुख योजनेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ केला. . यामुळे – राष्ट्रीय जलमार्ग 1 (गंगा नदी) तसेच राष्ट्रीय जलमार्ग 2 (ब्रह्मपुत्रा नदी) आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 (बराक नदी) द्वारे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज, जीआर जेट्टीवरून एमव्ही …
Read More »ग्वाल्हेरमध्ये जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन
मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मध्ये व्हिक्टोरिया मार्केट इमारत येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज फित कापून आणि फलकाचे अनावरण करून अत्याधुनिक भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (जीएसआय ) भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले. भव्य परंपरेसह आधुनिक नवकल्पनांच्या चमत्कारांचा अनोखा संयोग घडवत एका उल्लेखनीय सोहळ्याच्या स्वरुपात हा कार्यक्रम सादर झाला. ग्वाल्हेर भूविज्ञान संग्रहालय हे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi