पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष, महामहीम डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी प्रादेशिक परिस्थिविषयी सविस्तर चर्चा केली. या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी नुकत्याच वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी संवाद आणि मुत्सद्दीपणाचे महत्त्व अधोरेखित केले. दीर्घकालीन प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी युद्ध थांबवणे आवश्यक असल्याचा आवाहनाचा पुनरुच्चारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली
नवी दिल्ली, 16 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी चर्चा केली. अध्यक्षांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर, सायप्रसचे अध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधानांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागत केले. काल सायप्रस इथे दाखल झाल्यानंतर क्रिस्टोडौलिडेस यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्नेहपूर्ण स्वागत केले यातून दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर विश्वास आणि चिरस्थायी मैत्री …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी सायप्रस आणि भारतातील प्रमुख उद्योजकांशी साधला संवाद
नवी दिल्ली, 16 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांनी आज लिमासोल येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सायप्रस आणि भारतातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. या बैठकीला बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादक, संरक्षण, दळणवळण, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान सेवा, पर्यटन आणि वाहतूक अशा विभिन्न क्षेत्रातील …
Read More »पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यापूर्वीचे निवेदन
आज मी सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यासाठी रवाना होणार आहे. 15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ …
Read More »बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय सचिवांनी मार्सेल्स येथे घेतली सीएमए सीजीएम नेतृत्वाची भेट
भारत सरकारचे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय (एमओपीएसडब्ल्यू) सचिव श्री. टी. के. रामचंद्रन यांनी 12 जून 2025 रोजी फ्रान्समधील मार्सेल्स येथील सीएमए सीजीएमच्या जागतिक मुख्यालयाला भेट दिली. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौर्यादरम्यान त्यांनी सीएमए सीजीएम सोबत केलेल्या ऐतिहासिक संवादाचा पुढील टप्पा गाठण्याच्या उद्देशाने ही भेट होती. पंतप्रधानांच्या त्या संवादामध्ये भारताच्या वृद्धिंगत होत …
Read More »MV WAN हाय 503 जहाजावरील बचावकार्यासाठी भारतीय नौदलाचे हवाई मार्गाने बचाव पथकाला जहाजावर उतरवण्याचे धाडसी कृत्य
MV WAN हाय 503 या आग लागलेल्या जहाजावरील बचावकार्यासाठी भारतीय नौदलाने प्रयत्न सुरू केले. नौदलाने 13 जून 2025 रोजी आपल्या बचाव पथकाला हवाईमार्गे थेट जहाजावर उतरवण्याचे ठरवले. बचाव पथकाच्या सदस्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत कोची इथल्या आयएनएस गरुड येथून सीकिंग हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. बदलते हवामान, समुद्रातील दबलती स्थिती आणि जहाजावर लागलेली आग अशा आव्हानांचा सामना करत नौदलाच्या हेलिकॉप्टरने बचाव …
Read More »ब्राझीलमध्ये ११ व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या समारोपप्रसंगी लोकसभा अध्यक्षांचे निवेदन
ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी संसद, सरकार आणि या देशातील जनतेचे आभार मानतो. ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अर्थपूर्ण संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि ब्रिक्स राष्ट्रांमध्ये संसदीय सहकार्य मजबूत करण्यासाठी, एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक बाबींवर एकत्रितपणे काम करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दिसून आली. शिखर परिषदेचा समारोप अंतिम घोषणापत्र स्वीकारून …
Read More »पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर ब्रेशिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर इटलीचे उत्पादन केंद्र असलेल्या ब्रेसिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. पियुष गोयल यांच्या इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या (जेसीईसी) 22 व्या अधिवेशनाचे सहअध्यक्षपद भूषवले. यावेळी भारत आणि …
Read More »भारत-किर्गिझस्तान द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू
नवी दिल्ली, 5 जून 2025. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि किर्गिझस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री झीनबेक कुलुबाएव मोल्डोकानोविच यांनी आज नवी दिल्ली येथे भारत आणि किर्गिझिस्तान दरम्यानच्या द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आणि सहमतीपत्राचे आदानप्रदान केले. भारत सरकार आणि किर्गिझस्तान सरकार यांच्यात 14 जून 2019 रोजी …
Read More »पीयूष गोयल भूषविणार ‘भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या’(जेसीईसी) 22 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद
नवी दिल्ली, 4 जून 2025 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज आपल्या इटलीच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली. भारत-फ्रान्स आर्थिक सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेल्या फ्रान्समधील त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर गोयल 4 आणि 5 जून 2025 अशा दोन दिवसांच्या इटली दौऱ्यावर असतील. गोयल यांचा इटली …
Read More »
Matribhumi Samachar Marathi