Thursday, April 09 2026 | 07:48:56 AM
Breaking News

Miscellaneous

सीईआरटी-इन अर्थात भारतीय कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने परदेशी पत्रकारांसाठी केले भारताच्या सायबरसुरक्षा चौकटीसंदर्भात संवादाचे आयोजन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या संस्थेनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने 12 डिसेंबर 2025 रोजी युरोप, अमेरिका आणि मध्य आशियाई देशांमधील परदेशी पत्रकारांसाठी सायबर सुरक्षा परिचय भेट आणि संवादात्मक सत्राचे आयोजन केले. नवी दिल्ली येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (मेइटी) महासंचालक, CERT-In आणि प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक  डॉ. संजय बहल यांनी …

Read More »

विकसित भारत @ 2047 साठी डीआरडीओच्या दृष्टिकोनाचे प्रदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय राजभाषा वैज्ञानिक संगोष्ठीचे एचईएमआरएल’ने केले आयोजन

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) एक प्रमुख प्रयोगशाळा, हाय एनर्जी रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) ने 11-12 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त राजभाषा वैज्ञानिक आणि तांत्रिक संगोष्ठीचे (एसीई क्लस्टर) यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाची संकल्पना “विकसित भारत @ 2047 साठी डीआरडीओचे योगदान” अशी होती. या संगोष्ठीत संरक्षण प्रणालींमध्ये तांत्रिक श्रेष्ठता आणि स्वावलंबनाकडे भारताची प्रगती अधोरेखित करण्यात आली, तसेच …

Read More »

भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 भारतीय नौदल 16 डिसेंबर 2025 रोजी कोची येथे दक्षिण नौदल कमांडच्या अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या आणि निर्मितीच्या ‘डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट’ (डीएससी) मालिकेतील पहिले जहाज, ‘डीएससी ए20’ कार्यान्वित करणार आहे. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस ॲडमिरल समीर सक्सेना यांच्या उपस्थितीत हे जहाज औपचारिकपणे सेवेत दाखल …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार 2023 आणि 2024 चे वितरण

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे 2023 आणि 2024 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान केले. कला आपल्या भूतकाळातील आठवणींना, वर्तमानकाळातील अनुभवांना आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षांना प्रतिबिंबित करते,  प्राचीन काळापासून मानव आपल्या भावभावना चित्र किंवा शिल्पांच्या माध्यमातून व्यक्त करत आला आहे. …

Read More »

डीपीआयआयटी तर्फे एआय–कॉपीराइट इंटरफेसवरील कार्यपत्रा पहिला भाग प्रकाशित

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग(डीपीआयआयटी) यांनी जनरेटिव कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कॉपीराइट कायद्याच्या परस्परसंबंधांचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या कार्यपत्राचा पहिला भाग प्रकाशित केला आहे. ही कार्यपत्रिका 28 एप्रिल 2025 रोजी  डीपीआयआयटी  ने स्थापन केलेल्या आठ सदस्यांच्या समितीच्या (“समिती”) शिफारशींचा आढावा घेते. या समितीचे उद्दिष्ट जनरेटिव …

Read More »

भारताकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेच्या आरंभापूर्वी उलट्या गणतीला सुरुवात

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025 येत्या 17 ते 19 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे जागतिक आरोग्य संघटनेची, दुसरी जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने ही परिषद आयोजित केली जाईल. या पार्श्वभूमीर आयुष मंत्रालयाने आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात या परिषदेची रुपरेषा मांडणाऱ्या पत्रकार …

Read More »

वीर नारी, माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन

देशात आज 7 डिसेंबर 2025 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा होत आहे. सशस्त्र दलांच्या शौर्य, समर्पण, बलिदान आणि अढळ वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा  हा प्रसंग आहे. बाह्य आणि अंतर्गत आव्हानांपासून देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देऊन …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2025 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. समानता हा दिव्यांग व्यक्तींचा देखील अधिकार आहे. समाज आणि  राष्ट्राच्या विकासाच्या यात्रेत त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हे  दानधर्माचे कार्य नव्हे तर …

Read More »

पंतप्रधानांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे 2000 मंत्र 50 दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हंटले जाते. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे वय फक्त 19 वर्षे असून त्यांनी …

Read More »

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY), इलेक्ट्रॉनिक खेळणी प्रकल्पांतर्गत प्रशिक्षित अशा 18 तरुण अभियंत्यांच्या दुसऱ्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात ई-टॉयज लॅबचे उद्घाटन: सर्वसमावेशक आणि मजबूत स्वदेशी इलेक्ट्रॉनिक खेळणी उद्योग परिसंस्था तयार करण्यासाठीच्या प्रयत्नांना चालना

नवी दिल्‍ली, 30 नोव्हेंबर 2025. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), इंडियन टॉय इंडस्ट्रीज आणि LEGO ग्रुप C-DAC, यांच्या वतीने ‘डेव्हलपमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी-बेस्ड कंट्रोल अँड ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक गुड्स (टॉय इंडस्ट्री)’ या प्रकल्पांतर्गत एक वर्ष प्रशिक्षण घेतलेल्या अभियांत्रिकी पदवीधरांच्या दुसऱ्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. मंत्रालयाच्या …

Read More »