पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. जम्मू प्रदेशातील संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटनही केले जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन तर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची …
Read More »पंच प्रण हा राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले अधोरेखित
आपल्या राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया हा सामाजिक सलोखा, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण विषयक जाणीव, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये या पाच शक्तिशाली स्तंभांवर आधारलेला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. हे पाच संकल्प – अर्थात आपले पंच प्रण आपल्या समाजाच्या धमन्यांमधून प्रवाहित होत असून ते राष्ट्रवादाच्या अजेय भावनेला उत्तेजन देत असल्याचेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. …
Read More »ओंकारेश्वर तरंगते सौर उद्यान हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांच्या प्रगतीचे प्रतीक – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर उद्यानाला भेट दिली. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर आपली भावना व्यक्त …
Read More »भारतीय हवाई दलाद्वारे गुवाहाटी येथील वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंट (IOE) 2025 चे आयोजन
नवी दिल्ली, 04 जानेवारी 2025 भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आणि स्वदेशी नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वायु दलाच्या (IAF) वतीने इंडस्ट्री आउटरीच इव्हेंट 25 (IOE25) चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस नियोजित असलेल्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा 13 जानेवारी 2025 रोजी ऑनलाइन आणि दुसरा टप्पा 15 जानेवारी 2025 रोजी गुवाहाटी येथील वायु दलाच्या तळावर आयोजित केला जाईल. संरक्षण उद्योगातील भागीदार, नवोन्मेषक आणि स्टार्ट-अप्सना वायु …
Read More »एमएनएस विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीत संपन्न
लष्करी नर्सिंग सेवा (MNS) विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयाच्या संशोधन व संदर्भ विभागात ऍडजुटंट जनरल आणि लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालकांच्या – DGMS (Army) अध्यक्षतेखाली 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी पार पडली. ‘क्षमता बांधणी व नर्सिंग क्षेत्रातील क्षमता’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. Addl DGMNS मेजर जनरल इग्नेटीयस …
Read More »केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत योजनांबाबत आढावा बैठक
केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या विविध योजनांसंदर्भात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत दूरस्थ पद्धतीने आढावा बैठक घेतली. नवीन वर्षात नवीन संकल्पांसह आपण कृषी विकास आणि कृषक कल्याणाचे काम वेगाने सुरू ठेवू, असे शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रालयाच्या विविध कामांचा आढावा …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन केले. विकसित भारत 2047 च्या दृष्टीने लवचिक ग्रामीण भारताची उभारणी ही या महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवात भाषणाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी उपस्थितांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित केलेला भव्य ग्रामीण भारत महोत्सव ही …
Read More »वंदे भारत स्लीपर रेल्वेगाड्या लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना लवकरच देणार जागतिक दर्जाच्या रेल्वे प्रवासाचा अनुभव
हे नवे वर्ष भारतातील प्रवाशांना जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाची भेट देण्यासाठी सज्ज झाले आहे. केंद्र सरकारने याआधीच देशभरातील रेल्वे प्रवाशांकरता, कमी आणि मध्यम पल्ल्याच्या बसण्याची आसन व्यवस्था ( chair car) असलेल्या रेल्वे गाड्यांमधून जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची सुविधा यशस्वीरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे याच प्रकारच्या …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयलंड डेव्हलपमेंट एजन्सीची (आयडीए) सातवी बैठक संपन्न
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी (आयडीए), अर्थात बेट विकास संस्थेची सातवी बैठक पार पडली. बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय, अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासन आणि लक्षद्वीप प्रशासनाने …
Read More »राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 3 जानेवारी 2025 रोजी, दिल्ली कँट येथील पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत 18 मित्र …
Read More »
Matribhumi Samachar Marathi