Monday, January 26 2026 | 10:04:41 AM
Breaking News

National

विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी ‘विकसित गाव’ घडवा : राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांचे आवाहन

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2025. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी ‘विकसित गाव’ घडवण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्ली येथे आज ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कामकाज आढावा समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. विकसित गाव म्हणजे प्रत्येक कुटुंबाकडे मूलभूत सुविधेसह पक्के घर असेल, प्रत्येक खेडे दर्जेदार …

Read More »

खतांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्यांना मोहीम राबविण्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे निर्देश

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बनावट व निकृष्ट खतांच्या विरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात बनावट खतांची विक्री, अनुदानित खतांचा काळाबाजार तसेच सक्तीचे  टॅगिंग यासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. …

Read More »

‘निस्तार ‘ हे पहिले स्वदेशी पाण्याखाली मदतकार्य करणारे जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द

नवी दिल्ली, 9 जुलै 2025 ‘निस्तार’ हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली  उतरून मदतकार्य करणारे पहिलेच  जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने 8 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. या युद्धनौकेची रचना आणि बांधणी भारतीय नौवहन नोंदणीच्या(IRS) वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे जहाज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनावटीचे असून …

Read More »

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट नदी व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली, 9 जुलै 2025. नमामी  गंगे कार्यक्रमांतर्गत देशभरातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे महत्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, नद्यांच्या सर्वसाधारण, तर लहान नद्यांच्या विशेष व्यवस्थापनातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचे भवितव्य या …

Read More »

आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ 10 जुलै रोजी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करणार

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आय बी सी) आणि महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया यांनी, गुरुवारी, 10 जुलै 2025 रोजी आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यासाठी सारनाथ येथील मूलगंध कुटी विहार येथे एका पवित्र  आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी …

Read More »

खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागामुळे,आपली जबाबदारी आता नियंत्रकाची नसून,सुविधा देणाऱ्याची आहे

नवी दिल्ली, 7 जुलै 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 07 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित केले. त्यांनी सशस्त्र दलांची परिचालन सज्जता आणि आर्थिक तत्परता यांना बळकटी देण्यात विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख केला आणि आपल्या सैन्याचे शौर्य …

Read More »

संरक्षण लेखा विभागाने 7 जुलै रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या नियंत्रक परिषद 2025 चे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

संरक्षण लेखा विभागाने (डीएडी) 7 ते 9 जुलै 2025 दरम्यान नवी दिल्लीतील डीआरडीओ भवनातील डॉ. एसके कोठारी सभागृहात नियंत्रक परिषद 2025 चे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन सात जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) …

Read More »

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने केले जप्त

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतील, झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे दि. 5 जुलै रोजी केलेल्या केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये प्रवाशांकडून तस्करी केला जात असलेला 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त केला. या अंतर्गत पहिल्या प्रकरणातून 9.662 किलोग्रॅम वजनाचा, 9.662 कोटी रुपये किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आला. तसेच दुसऱ्या प्रकरणात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) जप्त …

Read More »

सुरक्षेसाठी ग्राहकांना फक्त भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे केंद्राचे आवाहन

भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) तर्फे देशभरातील ग्राहकांना केवळ बीआयएस-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विभागाने बीआयएस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचे उत्पादन किंवा विक्री करण्याविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय रस्त्यांवर 21 कोटींहून अधिक दुचाकी वाहने असल्याने, दुचाकीस्वारांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत …

Read More »

भारतीय नौदलाची वार्षिक सुरक्षा आढावा 2025 बैठक

भारतीय नौदलाच्या सुरक्षेसंबंधी  शिखर बैठकीची आठवी आवृत्ती, वार्षिक सुरक्षा आढावा 2025, 02 ते 03 जुलै 2025 दरम्यान दक्षिण नौदल कमांड, कोची येथे आयोजित करण्यात आली होती. मिश्र पद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही) झालेल्या या बैठकीत नौदलाच्या मुख्यालयातील अधिकारी, सर्व कमांड मुख्यालयांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा वर्ग अधिकाऱ्यांनी भाग घेतला. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस एडमिरल व्ही श्रीनिवास यांनी मुख्य …

Read More »