Thursday, December 11 2025 | 11:08:44 AM
Breaking News

Regional

भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे हॉट एअर बलूनिंग मोहिमेने रचला नवा विक्रम

पुणे, 10 डिसेंबर 2025 भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचे आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले.‌‌ भोपाळमधील ईएमई सेंटर येथील हॉट एअर बलूनिंग नोडने भारतीय लष्कराच्या साहसी विंगच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोहिमेला 30 नोव्हेंबर 2025 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 750 किलोमीटरहून अधिक …

Read More »

संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन

पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर रोजी गोव्यातील पणजी इथल्या  संचार भवन येथे त्रैमासिक पेन्शन अदालतचे आयोजन केले. महाराष्ट्र आणि गोवा चे संचार लेखा नियंत्रक  डॉ. सतीश चंद्र झा या अदालतच्या अध्यक्षस्थानी होते. अदालतच्या कार्याबद्दल माहिती देताना डॉ. झा म्हणाले की …

Read More »

नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता  कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती करून त्याद्वारे भाजीपाला निर्माण केल्यास आपण जे मातीला दिलं तीच माती आपल्याला भरभरून देईल असे प्रतिपादन नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स  फोर्स एनडीआरएफ अकॅडमी चे नागपूर येथील उपमहासंचालक डॉ . हरिओम गांधी यांनी केलं .केंद्रीय …

Read More »

नागपूरच्या प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्राद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे 5 डिसेंबर रोजी आयोजन

नागपूर 4 डिसेंबर 2025. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या अमरावती रोड स्थित गोंडखैरी येथील प्रादेशिक सेंद्रीय आणि  शेती केंद्र -आरसीओएनएफ द्वारे  5 डिसेंबर शुक्रवार रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक शेती संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकाचे नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित एनडीआरएफ अकॅडमी येथे सकाळी 10  वाजता आयोजन …

Read More »

अंतिम ग्राहकापर्यंत शाश्वत सेवा वितरण बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने 200 इलेक्ट्रिक दुचाकींचा केला प्रारंभ

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आपल्या सेवा वितरणाचे जाळे आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत टपाल वितरणासाठी  200 इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचा शुभारंभ केला. पार्सलच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरात वितरण सेवा अधिक उत्कृष्ट करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुंबईत चकाला एम आय डी …

Read More »

मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रातर्फे अणु विज्ञान आणि नवोन्मेषाची झलक दाखविणाऱ्या दोन दिवसीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन

मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राने (एनएससी) रोसाटॉम आणि एनर्जी ऑफ द फ्युचर यांच्या सहकार्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा दोन दिवसीय उत्सव सायन्स फेस्टिव्हल इंडिया 2025 चे आयोजन 3-4 डिसेंबर 2025 रोजी एनएससी मुंबई येथे केले. प्रत्यक्ष क्रियाकलाप, तल्लीन करणारे शिक्षणानुभव आणि सर्जनशील अन्वेषण यांचे आकर्षक मिश्रण असणारा हा महोत्सव विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबे आणि विज्ञानोत्साही लोकांसाठी …

Read More »

क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील खासदारांची घेतली बैठक

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025 केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांची “क्षयरोगमुक्त भारताचे समर्थन करणारे खासदार” या विषयावर महत्वाची बैठक बोलावली होती. न्यू महाराष्ट्र सदन येथील पत्रकार परिषद सभागृहात झालेल्या या सत्रात लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार एकत्र आले, आणि भारताच्या क्षयरोगा विरोधातील ऐतिहासिक लढाईचे …

Read More »

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे काशी तमिळ संगमम 4.0 ला केले संबोधित

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. काशी आणि तामिळनाडू यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंध साजरे करणाऱ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाच्या चौथ्या वर्षीच्या सोहोळ्यानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी विशेष व्हिडीओ संदेश पाठवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्ष 2022 मध्ये काशी तमिळ संगममचे आयोजन सुरु झाल्यापासून हा उपक्रम गंगातीरावरील संस्कृती आणि कावेरीतीरी वसलेल्या परंपरा यांना एकत्र …

Read More »

छत्रपती संभाजीनगर मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

मुंबई , 2 डिसेंबर 2025. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 या वर्षात अतिवृष्टी आणि पुरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 6 लाख 8 हजार 956 हेक्टर क्षेत्र आणि 6 लाख 89 हजार 75 शेतकरी बाधित झाले आहेत. पिकांच्या नुकसानीचे आर्थिक मूल्य अंदाजे 1695.01 कोटी रुपये इतके आहे. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण …

Read More »

मुंबईच्या नागरिकांना आधुनिक, शाश्वत व शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणारी सेवा देण्यासाठी भारतीय टपाल विभागाचा परिवर्तनकारी उपक्रम

मुंबई , 2 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण व शाश्वतिकरण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्स ची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या मुंबई क्षेत्राने पायी पत्रे पोहचवण्यापेक्षा …

Read More »