Wednesday, December 10 2025 | 08:56:28 PM
Breaking News

Regional

महाकुंभ 2025: केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांनी अलाहाबाद वस्तूसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या’भागवत’ प्रदर्शनाचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल अलाहाबाद संग्रहालयात भरविण्यात आलेल्या लघुचित्रांवर आधारित ‘भागवत’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महाकुंभाचा पवित्र आणि दिव्य सोहळा आणखी भव्य आणि अनोखा व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रयागराज येथील  या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाने जपणूक केलेले ‘भागवत’ प्रदर्शन, …

Read More »

महापेक्स 2025: महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या एका प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, 23 जानेवारी 2025 महापेक्स 2025 राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान मुंबईतील कफ परेड भागातील विश्वेश्वरय्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू राहणार आहे. अतिशय प्रतिष्ठेचे हे प्रदर्शन महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि टपाल वारशाचे प्रदर्शन घडवेल, सोबतच या संपूर्ण प्रदेशातील टपाल तिकिटे संग्रहकर्ते, संग्राहक …

Read More »

महाकुंभ मेळ्यात आयुषच्या सेवा सुविधा

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025 प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आरोग्य सुविधांच्या अंतर्गत आयुष बाह्यरुग्ण विभाग, उपचार  केंद्र, विविध दुकाने आणि सत्रे यांसारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या सुविधा भाविक, यात्रेकरू आणि या मेळ्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरू लागली आहेत. या महासोहळ्याअंतर्गत आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय …

Read More »

केंद्रीय मंत्री रक्षा निखिल खडसे ‘जय हिंद पदयात्रे’द्वारे पराक्रम दिवस करणार साजरा; पोर्ट ब्लेअर येथे होणार नेताजींच्या वारशाचा सन्मान

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे 23 जानेवारी 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘जय हिंद पदयात्रा’ करणार आहेत. हा उपक्रम नेताजींच्या अतुलनीय योगदानाला आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी …

Read More »

प्रयागराजमध्ये हमारा संविधान हमारा स्वाभिमान कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान (HS2) ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका …

Read More »

कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे: “कर्नाटकातील उत्तर कन्नड …

Read More »

पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला  राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले: “मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मणिपूरच्या प्रगतीसाठी माझ्या …

Read More »

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे. आपली समृद्ध संस्कृती …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः “मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत …

Read More »

मिझोरमच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने X वर माहिती दिली आहे: “मिझोरामचे राज्यपाल @Gen_VKSingh यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @MizoramGovernor” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से …

Read More »