भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 27-28 जानेवारी 2025 रोजी मस्कत, ओमान येथे होणाऱ्या 11व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत (जेसीएम) सहभागी होणार आहेत. या बैठकीत ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहिम कैस बिन मोहम्मद बिन मूसा अल-यूसुफ यांच्यासोबत चर्चा होईल. ओमान हा भारताचा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. तसेच 2023-2024 मध्ये भारत-ओमान यांच्यातील …
Read More »अणुऊर्जा विभागाने साजरा केला 76वा प्रजासत्ताक दिन
डीएइ अर्थात अणुऊर्जा विभागाने 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या प्रसंगी अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मोहंती यांनी ओल्ड यॉट क्लब येथे असलेल्या अणुऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रध्वज फडकवला. त्यांनी संचलनाची पाहणी केली. अणुऊर्जा विभागाचे सुरक्षा पथक आणि एइसीएस शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केले. सचिवांनी …
Read More »भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले. नेपाळच्या पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले: “तुमच्या हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद पंतप्रधान @kpsharmaoli. भारत आपल्या प्रजासत्ताकाची 75 वर्षे पूर्ण करत असताना, आम्ही आपल्या दोन्ही देशांच्या लोकांमधील मैत्रीच्या ऐतिहासिक बंधांना देखील मनापासून जपत आहोत. येणाऱ्या काळात हे …
Read More »केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह 28.01.2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ येथे हातमाग परिषदेचे उद्घाटन करणार आहेत
“हँडलूम कॉन्क्लेव्ह- मंथन” ही हातमाग विणकर/उत्पादक, किरकोळ विक्रेते, खरेदीदार, डिझायनर, शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअप संस्थापक, हातमाग उद्योजक/नवोन्मेषक, हातमाग सहकारी संस्था, ई-वाणिज्य कंपन्या अशा हातमाग क्षेत्रातील विविध भागधारकांसाठी तसेच माननीय पंतप्रधानांच्या 5एफ व्हिजन – शेती ते फायबर ते कारखाना ते फॅशन ते परदेश अशा सर्व विभागांमधील हातमाग क्षेत्राचा भविष्यातील रोड मॅप तयार करण्यासाठी संवादात्मक कार्यशाळा आहे. या परिषदेत सुमारे 250 भागधारक उपस्थित राहणार आहेत, ज्यात 21 पॅनलिस्ट, देशाच्या …
Read More »स्वीप उपक्रमाअंतर्गत राबवलेल्या उल्लेखनीय मतदार जागृतीपर अभियानासाठी केंद्रीय संचार ब्युरोचा महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव
आज (25 जानेवारी 2025) साजरा झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात, केंद्रीय संचार ब्युरोच्या (CBC) पुणे (महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र) कार्यालयाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या काळात स्वीप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) अर्थात मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूकीतील सहभाग या उपक्रमाअंतर्गत राज्यभर जनजागृती …
Read More »दूरदर्शनसाठी अभिमानाचा क्षण : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जागृतीसाठीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यम (दूरचित्रवाणी) वर्गवारीतल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान
मतदार जागृती आणि मतदार साक्षरतेविषयक सर्व पैलू व्यापणारी मोहीम राबवल्याबद्दल दूरदर्शनला भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यम (दूरचित्रवाणी) वर्गवारीतल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने आज सन्मानित केले गेले. ही माहिती सामायिक करताना दूरदर्शनला प्रचंड अभिमान वाटतो आहे. दूरदर्शनने लोकसभा निवडणूक 2024 च्या काळात “चुनाव का पर्व देश का गर्व” या मालिकेसह, प्रभावी प्रसारण केले …
Read More »प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर
प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. पदकांचे विभाजन खालीलप्रमाणे आहे: – शौर्य पदके पदकांची नावे पदकांची संख्या शौर्य पदक (जीएम) 95* * पोलीस सेवा-78 आणि अग्निशमन सेवा-17 जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हेगारांना अटक …
Read More »जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार-2024 प्रदान करण्यासाठी राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
राष्ट्रपतींनी, 49 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार – 2024 प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. यात 17 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 9 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि 23 जणांना जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे. सहा जणांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:- 17 जणांना सर्वोत्कृष्ट जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. Shri Pintu …
Read More »पद्म पुरस्कार 2025 जाहीर
देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/उपक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार …
Read More »सागरी जैवतंत्रज्ञानातील नवोन्मेषासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून सीएसआयआर – एनआयओ उद्योग सहकार्य मजबूत करत आहे
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मुंबईच्या इनोव्हेशन कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन समारंभात, गोव्यातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने (CSIR-NIO) सागरी जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत नॉन-डिस्क्लोजर अर्थात प्रकटीकरण न करणाऱ्या करारावर (NDA) आणि सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. या कार्यक्रमाला नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत आणि डॉ. व्ही. के. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi