Sunday, December 07 2025 | 11:39:45 PM
Breaking News

भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलने हस्तलिखित पत्रलेखनाची कला साजरी करणारा पत्र लेखन महोत्सव म्हणजेच “पत्र उत्सव 2.0” ची दुसरी आवृत्ती केली आयोजित

हाताने पत्र लिहिण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या “पत्र उत्सव 2.0” महोत्सवाची दुसरी आवृत्ती आज  17 डिसेंबर 2024 रोजी मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (GPO) येथील वितरण कक्षात आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात पत्र लेखन आणि अच्युत पालव कॅलिओग्राफी  विद्यालयाच्या अंतर्गत …

Read More »

महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाकडून जागतिक बुद्बिबळ विजेत्या डी.गुकेशचा विशेष कॅन्सलेशनद्वारे सन्मान

जागतिक बुद्बिबळ अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारताच्या गुकेश डी. या बुद्धिबळपटूच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाने एका विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन केले. गुकेशने  फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2024 या स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून, सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनून इतिहास घडवला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र आणि …

Read More »

श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार प्राप्त  श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले.  आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी  लिहिले आहे: “कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कारप्राप्त   श्रीमती तुलसी गौडा जी,यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.आपले संपूर्ण जीवन त्यांनी,हजारो रोपे लावून निसर्गाचे संगोपन करत आपल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे ‘एक वर्ष-परिणाम उत्कर्ष’ या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ एक वर्ष-परिणाम उत्कर्ष’:राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती …

Read More »

फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख

फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे: “मायोट मध्ये चिडो …

Read More »

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठीचा लोगो शुभंकर आणि जर्सीचा लोकार्पण सोहळा

उत्तराखंड येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमासाठी लोगो, शुभंकर आणि जर्सी चा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावून देशभरातील खेळाडूंमध्ये संवाद आणि क्रीडा स्वभावाची भावना वृद्धिंगत करत …

Read More »

सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून भारताचे रूपांतर

युएनडब्ल्युटीओ  बॅरोमीटर  (मे 2024) अर्थात संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्थेनुसार, 2023* या वर्षात आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमन आकडेवारी नुसार भारत जागतिक स्तरावर 24 व्या क्रमांकावर होता. या कालावधीत, भारतात 18.89 दशलक्ष  आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन नोंदवले गेले, जे 2022 मधील 14.33 दशलक्षच्या तुलनेत 31.9% ची लक्षणीय वाढ दर्शविते. *काही देशांमधील डेटा गहाळ …

Read More »

वाढवणच्या युवकांना सक्षम करण्यासाठी व्हीव्हीपीएल ने सुरु केला कौशल्य कार्यक्रम

भारतातील 13 वे प्रमुख  बंदर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) ने आज (16 डिसेंबर 2024) वाढवण बंदर कौशल्य कार्यक्रम  सुरू करण्याची घोषणा केली आहे. या भागातील युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्याने  सुसज्ज करणे हा यामागचा उद्देश आहे. यावेळी अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण- जेएनपीए …

Read More »

‘प्रशासन गाव की ओर’ मोहीम : सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी कार्यालय सर्व उपकार्यालयांमध्ये आयोजित करणार शिबिरे

सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी ‘प्रशासन गाव की ओर’ मोहिमेचा एक भाग म्हणून, दक्षिण गोवा जिल्हा सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 18 ते 23 डिसेंबर 2024 दरम्यान विशेष शिबिरे आयोजित करणार आहे. या शिबिरात सामान्य माणसाच्या तालुका मामलतदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासह सरकारी विभाग …

Read More »

गती शक्ती पोर्टलचे ई-श्रम पोर्टलबरोबर एकत्रीकरण

सत्यापित आणि आधारशी संलग्न असा असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी देशभरात ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) सुरु  केले.  ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड देऊन त्यांची नोंदणी आणि त्यांना मदत  करण्यासाठी आहे. गति शक्ती राष्ट्रीय बृहत …

Read More »