केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत 2024-25 या मुल्यांकन वर्षासाठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची देय तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) च्या स्पष्टीकरण 2 च्या खंड (a) मध्ये संदर्भित करदात्यांसाठी पूर्वी परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 होती. सीबीडीटी ने परिपत्रक क्र.13/2024, F.No.225/205/2024/ITA-II दिनांक 26.10.2024 रोजी जारी केले आहे. सदर परिपत्रक www.incometaxindia.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Read More »लोकपालांनी, कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली
लोकपालांनी दिनांक 18 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे,लोकपालांसाठी कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. लोकपालांनी भारताच्या लोकपाल कार्यालयातील कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठी निकष तयार केले आहेत. हे निकष 25 सप्टेंबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे लोकपालांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर, दिनांक …
Read More »