गुरुवार, नवंबर 07 2024 | 02:00:28 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / इफ्फी 2024 मध्ये फिल्म बाजार व्ह्युईंग रुममध्ये 208 चित्रपटांचे होणार प्रदर्शन

इफ्फी 2024 मध्ये फिल्म बाजार व्ह्युईंग रुममध्ये 208 चित्रपटांचे होणार प्रदर्शन

Follow us on:

20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान गोव्याचे सांस्कृतिक परिदृश्य उजळून टाकण्यासाठी 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी सज्ज झाला आहे. या सोबतच 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान फिल्म बाजारच्या 18व्या आवृत्तीचं देखील आयोजन करण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते आणि उद्योगातील व्यावसायिकांना परस्परांसोबत जोडले जाण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आणि आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवण्यासाठी हा एक महत्त्वाचा मंच आहे.

यावर्षी पुन्हा एकदा मॅरियट रिसॉर्टमध्ये व्ह्युईंग रुम अर्थात अवलोकन सभागृह असेल ज्या ठिकाणी भारत आणि दक्षिण आशियातील उत्तमोत्तम चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल.

आपल्या चित्रपटांच्या वितरणाच्या आणि त्याला अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपट निर्मात्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून रचना करण्यात आलेल्या व्ह्युईन्ग रुममध्ये पूर्ण झालेल्या किंवा निर्मिती-पश्चात स्थितीत असलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येते ज्यामुळे या निर्मात्यांना जागतिक चित्रपट प्रोग्रॅमर्स, वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदार यांच्यासोबत संपर्क प्रस्थापित करता येतो. ही व्हुईंग रुम 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध असेल.

व्हुईंग रुम लायब्ररीच्या या वर्षीच्या आवृत्तीमध्ये 208 चित्रपट उपलब्ध असतील ज्यापैकी 145 फीचर फिल्म्स आहेत, मध्यम लांबीच्या 23 फिल्म्स आणि 30 लघुपट आहेत. फीचर आणि मध्यम लांबीच्या एकंदर क्रमवारीमध्ये एनएफडीसीची निर्मिती असलेल्या आणि सह-निर्मिती असलेल्या 12 चित्रपटांचा समावेश आहे आणि एनएफडीसी-एनएफएआयच्या बुकेमधील 10 पुनरुज्जीवित चित्रपटांचा समावेश आहे. 30 ते 70 मिनिटांचा कालावधी असलेल्या, व्हुईंग रुमकडे पाठवण्यात आलेल्या  फिल्म्स मध्यम-लांबीच्या फिल्म्सच्या श्रेणीत प्रदर्शित केल्या जातील. 30 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या फिल्म्स लघुपट श्रेणीत असतील.

फिल्म बाजार शिफारस(FBR)

फिल्म बाजार 19 फीचर फिल्म्स, मध्यम लांबीच्या 3 फिल्म्स, दोन लघुपट आणि संपूर्ण मिश्रणातून पुनरुज्जीवित केलेल्या 3 फिल्म्स यांचा समावेश असलेल्या 27 प्रकल्पांची शिफारस करत आहे.

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार म्हणाले, चित्रपट निर्मात्यांची सृजनशीलता आणि ध्यास यांचा गौरव करणाऱ्या एफबीआरसाठी निवड झालेल्या चित्रपटांची घोषणा करताना आम्ही अतिशय रोमांचित झालो आहोत. केवळ आपली ओळख निर्माण करण्यासाठीच नव्हे तर कथाकथनकारांना आपला दृष्टीकोन जगासमोर मांडण्याची संधी देण्यासाठी देखील हा उपक्रम उपयुक्त आहे. चित्रपटांच्या परिवर्तनकारी सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे आणि प्रेरणा देणाऱ्या आणि मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या पुढच्या पिढीला पाठबळ देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

एफबीआरसाठी निवड झालेल्या प्रकल्पांना त्यांच्या फिल्म्स निर्माते, विक्री प्रतिनिधी, वितरक, महोत्सव प्रोग्रामर्स आणि संभाव्या गुंतवणूकदारांसह उद्योग धुरिणांसमोर फिल्म बाजारमधील खुल्या सादरीकरण सत्रात मांडण्याची संधी असेल.एफबीआर सेक्शनसाठी निवड झालेल्या फीचर, मध्यम-लांबीच्या आणि लघुपट निर्मात्यांना त्यांच्या फिल्म्स निर्माते, विक्री प्रतिनिधी, वितरक, महोत्सव प्रोग्रामर्स आणि संभाव्या गुंतवणूकदारांसह उद्योग धुरिणांसमोर गोव्यामधील फिल्म बाजारमधील खुल्या सादरीकरण सत्रात मांडण्याची संधी असेल.

या चित्रपटांची संपूर्ण यादी याप्रमाणे आहे.

फिल्म बाजार विषयी

दक्षिण आशियायी फिल्म्सची एका आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्धी करण्याच्या  उद्देशाने स्थापन करण्यात आलेला फिल्म बाजार हा एक व्यावसायिक मंच आहे. फिल्म बाजारमधील व्ह्युईंग रुम म्हणजे चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी, जागतिक विक्री प्रतिनिधी आणि खरेदीदारांकडे प्रसिद्धी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणारा सशुल्क मंच आहे.

व्ह्युईंग रुम हा एक प्रतिबंधित विभाग आहे जो विक्रेत्यांना(चित्रपटनिर्माते) जगभरातील खरेदीदारांसोबत( फिल्म प्रोग्रामर्स, वितरक, जागतिक विक्री प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार) जोडतो. फिल्म बाजार टीम त्यांच्या प्रोफाईलच्या आधारे खरेदीदारांना मार्गदर्शन करते.विशेष प्रकारे तयार करण्यात आलेल्या  व्ह्युईंग रुम सॉफ्टवेअरच्या मदतीने खरेदीदार चित्रपटांचे तपशील त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांची माहिती देखील जाणून घेऊ शकतात.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

भारतीय अन्न महामंडळात 2024 -25 आर्थिक वर्षात 10,700 कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक समितीने …