गुरुवार, दिसंबर 19 2024 | 03:06:11 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / दक्षता जागृती सप्ताह 2024 मध्ये राष्ट्रपती सहभागी

दक्षता जागृती सप्ताह 2024 मध्ये राष्ट्रपती सहभागी

Follow us on:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दक्षता जागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ( 8  नोव्हेंबर 2024 ) सहभागी झाल्या.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या समाजात इमानदारी   आणि शिस्त ही आयुष्यातली आदर्श तत्वे मानली जातात. भारतीयांना बेशिस्त आवडत नाही, ते कायद्याचे पालन करतात. त्यांच्या जगण्यात साधेपणा व काटेकोरपणा आहे असे मत सुमारे 2300 वर्षांपूर्वी मेगॅस्थेनीसने भारतीयांविषयी नोंदविले होते. फाहियान यानेही आपल्या पूर्वजांबद्दल असेच मत नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दक्षता जागृती सप्ताहाची ‘देशाच्या समृद्धीसाठी इमानदारीची संस्कृती’ ही संकल्पना अगदी समर्पक आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, विश्वास हा सामाजिक जीवनाचा पाया आहे.भ्रष्टाचार हा केवळ देशाच्या आर्थिक प्रगतीमधील अडसर नाही; तर त्यामुळे समाजातली विश्वासाची भावनाही  कमी होते. लोकांमधल्या ऐक्याच्या भावनेवर त्याचा विपरित परिणाम होतो. देशाचे ऐक्य आणि अखंडता यावरही भ्रष्टाचाराचा व्यापक परिणाम दिसून येतो. दरवर्षी 31 ऑक्टोबर या सरदार पटेलांच्या जन्मदिनी आपण देशाची एकता व अखंडता कायम राखण्याची शपथ घेतो. ही केवळ एक रीत अथवा परंपरा नाही. ही गांभीर्याने घ्यायची शपथ  आहे. ही शपथ पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

नीतीमत्ता हा भारतीय समाजाचा आदर्श आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी सांगितले की, कोणतेही काम चांगल्या हेतूने व निर्धाराने  केले तर त्यात हमखास यश मिळण्याची खात्री असते.

भ्रष्ट व्यक्तीविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारवाईला झालेला विलंब अथवा कमकुवत कारवाईमुळे भ्रष्ट व्यक्तींना पाठबळ मिळते, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …