बुधवार, नवंबर 13 2024 | 05:32:18 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / हज यात्रेमध्ये समावेशकता आणि समानतेला चालना

हज यात्रेमध्ये समावेशकता आणि समानतेला चालना

Follow us on:

हज ही इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आणि सौदी अरेबियातील मक्का येथील  एक पवित्र तीर्थयात्रा असून  आयुष्यात किमान एकदा तरी  ही यात्रा करण्याची मुस्लिम बांधवांची  इच्छा असते. भक्ती आणि अध्यात्माच्या सामायिक भावनेने दरवर्षी लाखो लोक मक्केत जमतात. केंद्र सरकारने, हजचे महत्त्व ओळखून, विशेषत: अल्प उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी तीर्थयात्रा सुलभ करण्यासाठी तरतुदी केल्या आहेत.  विशेषत: कठीण  आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांसाठी सुलभता वाढवण्यासाठी यात्रेकरू मदत आणि सुविधा कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. सध्या केल्या जात असलेल्या  सुधारणा आणि धोरणात्मक सुधारणांमुळे हजचा अनुभव अधिक समृद्ध झाला असून  सर्वसमावेशकतेला चालना मिळाली आहे आणि आता मुस्लिम समुदायातील विविध घटक या  आध्यात्मिक प्रवासात सहभागी होऊ शकतात.

अडचणी-मुक्त हज प्रवासासाठी पुढाकार

गेल्या काही वर्षात , सरकारने हज प्रवास अडचणी-मुक्त करण्यासाठी अनेक सुधारणा अंमलात आणल्या असून उत्तम सुविधा आणि सोयीसाठी  डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे उपक्रम महिलांच्या समानतेला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे जास्तीत जास्त  महिलांना स्वतंत्रपणे तीर्थयात्रा करणे शक्य झाले आहे.

हज अनुदान रद्द

भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रवास खर्चाची भरपाई करण्याच्या उद्देशाने  हज अनुदान  1994 मधील 10.51 कोटी  रुपयांवरून वाढवून 2012-13 मध्ये 836.56 कोटी रुपये करण्यात आले. मात्र  हज 2018 साठी अनुदान हळूहळू कमी करण्यात आले आणि पूर्णपणे रद्द करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत विक्रमी 4.54 लाख भारतीय यात्रेकरूंनी अनुदानाशिवाय हज यात्रा केली आहे.

हज यात्रेसाठी महिलांना मेहराम (पुरुष साथीदार) ची आवश्यकता हटवण्यात आली

गेली अनेक दशके , भारतातील मुस्लिम महिलांनी मेहराम (पुरुष साथीदार) शिवाय हज यात्रा करण्याच्या त्यांच्या अधिकाराचे समर्थन केले  आहे. शिक्षक आणि डॉक्टरांसारख्या व्यावसायिकांसह अनेकांना या आवश्यकतेमुळे अनेक अडचणींचा  सामना करावा लागला आहे.

हज 2023 साठी हाती घेण्यात आलेले प्रमुख नवीन उपक्रम:

• केंद्र सरकारने बादल्या, चादरी, सुटकेस यांसारख्या वस्तूंची अनिवार्य खरेदी केल्यामुळे होणारा अनावश्यक खर्च काढून टाकून हज पॅकेजमध्ये विशेष खर्च कपातीचे उपाय केले आहेत.

• प्रत्येक हज यात्रेकरूला 2100 सौदी रियाल देण्याची अनिवार्य तरतूद रद्द करण्यात आली आहे आणि यात्रेकरूंना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार सौदी रियाल मिळविण्याची सूट दिली जात आहे.

• प्रथमच, इच्छूक यात्रेकरूंना थेट एसबीआय मार्फत अत्यंत स्पर्धात्मक दरात परदेशी  चलन आणि फॉरेक्स  पुरवले जात आहेत. यामुळे हज यात्रेकरूंद्वारे फॉरेक्स मिळविण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल.

• विम्याचा खर्च आधीच्या प्रति यात्रेकरू 13 रुपये वरून कमी करून प्रति यात्रेकरू 10.50 रुपये करण्यात आला आहे.

• या वर्षी, हज दरम्यान भारतातील यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि त्यांच्या संस्थांचा तसेच सौदी अरेबियातील  रुग्णालये/दवाखान्यांचा थेट सहभाग आहे.

• हज धोरणात विशेष तरतुदींचा समावेश करून दिव्यांगजन आणि वृद्ध यात्रेकरूंच्या सर्वसमावेशकतेची योग्य काळजी घेण्यात आली आहे.

• हज प्रतिनियुक्तीसाठी निवडलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यांमध्ये शारीरिक ताकद आणि अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत काम करणे समाविष्ट आहे, हज-2023 साठी प्रशासकीय प्रतिनियुक्तीची निवड केवळ सीएपीएफ कर्मचाऱ्यांमधून  केली जाते.

• हज-2023 साठी क्षेत्र- विशिष्ट तज्ञांचा समावेश करण्यासाठी आणि वैद्यकीय पथकाची  निवड सुधारण्यासाठी डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची  निवड आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे करण्यात आली आहे.

निष्कर्ष

हज कमिटी ऑफ इंडिया आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकारामुळे हज यात्रेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. हज समितीने सुधारित लॉजिस्टिक्स आणि समर्पित मदत सेवांद्वारे हजारो यात्रेकरूंसाठी सुलभता आणि आयोजन  सुधारून संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित केली आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

स्वीप उपक्रम : प्रत्येक मतदार मतदान करणार

छत्रपती संभाजीनगर,जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झाला. जिल्हाधिकारी …