शनिवार, नवंबर 23 2024 | 12:52:13 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / स्वीप उपक्रम : प्रत्येक मतदार मतदान करणार

स्वीप उपक्रम : प्रत्येक मतदार मतदान करणार

Follow us on:

छत्रपती संभाजीनगर,जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलिप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या चित्ररथास रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदार मतदान करणार, अशा घोषणा देत यावेळी  उपस्थित प्रत्येकाने आपण स्वतः तर मतदान करुच शिवाय आपल्या संपर्कातील आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनाही मतदान करण्यास सांगू असा निर्धार व्यक्त केला.

केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ चित्ररथातून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सोमवार दि.11 ते बुधवार दि.20 पर्यंत मतदार जनजागृतीची मोहिम राबविण्यात येत आहे. चित्ररथास आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास मार्गस्थ केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर, केंद्रीय संचार ब्यूरोचे सहाय्यक संचालक माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी डॉ .मिलिंद दुसाने स्वीप कक्षाचे  सहायक नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, आर जे प्रेषित, आर जे श्रेयस, आरजे अर्चना, आयर्न लेडी ऐश्वर्या, आयर्न मॅन डॉ. प्रफुल्ल जटाले, आघाव जिल्हा स्विप कक्षाचे नोडल अधिकारी स्वप्निल सरदार,तसेच सर्व तालुका स्वीप चे अधिकारी, कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये यानिमित्त पथनाट्य ,भारुड व विविध गीतामधून मतदान जाणीव जागृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये हा चित्ररथ फिरणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे येणार आहे, सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन संजीव सोनार यांनी केले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

‘सफरनामा’च्या उद्घाटनाने इफ्फीएस्टा ‘सफर’चा प्रारंभ

55 वा  इफ्फी  अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संगीत कला आणि संस्कृतीला मनोरंजनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी …