शुक्रवार, नवंबर 15 2024 | 08:56:09 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / 40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्कींग करण्याची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण; अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्याला 5 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ

40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्कींग करण्याची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण; अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्याला 5 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ

Follow us on:

40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण HUID(हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) पध्दतीने हॉलमार्किंग करण्यात आले  आहे, ज्यामुळे ग्राहकांचा  सोन्याच्या बाजारपेठेतील  विश्वास वाढेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. भारतीय मानक ब्युरोने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स अमेंडमेंट ऑर्डर, 2024 याअंतर्गत 5 नोव्हेंबर 2024 पासून सोने आणि सोन्याच्या दागिन्यांचे  अनिवार्य हॉलमार्किंग करण्याचा चौथा टप्पा सुरू केला.

याव्यतिरिक्त, चौथ्या टप्प्यात,  अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत 18 अतिरिक्त जिल्ह्यांमध्ये  हॉलमार्किंग केंद्रे स्थापन करण्यात आली  आहेत.  चौथ्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर, अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या जिल्ह्यांची एकूण संख्या आता 361 झाली आहे.

भारत सरकारच्या सक्रिय उपाययोजनांमुळे दररोज 4 लाखांपेक्षा जास्त सोन्याच्या वस्तूंना विशिष्ट HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) क्रमांकासह हॉलमार्क केले जात आहे,ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. अनिवार्य हॉलमार्किंगसाठी नव्याने समाविष्ट केलेल्या 18 जिल्ह्यांची यादी तपासण्यासाठी, पुढे  दिलेले परिशिष्ट पहा.

अनिवार्य हॉलमार्किंगची सुरुवात  झाल्यापासून, नोंदणीकृत जवाहिऱ्यांची  संख्या 34,647 वरून 1,94,039 पर्यंत वाढली आहे – त्यात पाचपटींहून अधिक  इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.  त्याचप्रमाणे, सोन्याची पारख करणे आणि हॉलमार्किंग करणाऱ्या केंद्रांची (एएचसी) संख्या 945 वरून 1,622 पर्यंत वाढली आहे.

BIS केअर हे ॲप ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता, BIS गुणवत्तेच्या चिन्हाचा गैरवापर आणि फसव्या जाहिरातींच्या तक्रारी दाखल करण्यास सक्षम बनवते. हे ॲप प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येते.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

वार्षिक नौदल विमान उड्डाण सुरक्षा बैठक(एनएफएसएम) आणि उड्डाण सुरक्षा चर्चासत्र(एफएसएस)- 2024

विशाखापट्टणममध्ये आयएनएस डेगा येथे 12-13 नोव्हेंबर रोजी, इस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली  हवाई उड्डाण सुरक्षा चर्चासत्र …