गुरुवार, नवंबर 21 2024 | 01:01:23 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान

Follow us on:

झारखंडमध्ये दुसर्‍या टप्प्यात 38 मतदारसंघांसाठी  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.59% मतदान झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघां मध्ये एकूण 67.04% मतदान झाले होते. दुसरीकडे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 58.22 टक्के मतदान झाले.  सुलभ मतदानासाठी आणि प्रोत्साहनपर मोहिमांसाठी आयोगाने अनेक उपाययोजना राबवूनही, राज्यातील शहरी मतदारांनी मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये कमी मतदानाची आपली निराशाजनक परंपरा कायम ठेवली.  एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये आणि झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 38 मतदारसंघांसाठी  एकाचवेळी मतदान आज शांततेत पार पडले.

आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान झाले. दोन्ही राज्यांमध्ये, शेवटचे अहवाल आले तेव्हाही मतदार रांगेत उभे होते. 15 राज्यांमध्ये 15 विधानसभा मतदारसंघांसाठी  आणि एका लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक देखील आज पार पडली. एकंदर, झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, 15 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका,दोन टप्प्यांत पूर्ण झाल्या आहेत.

मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांच्यासह  ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू हे निवडणूक आयुक्त, मतदारांचा सहभाग वाढवण्याच्या उपायांचा समावेश असलेल्या मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूवर बारीक लक्ष ठेवून होते.  उत्तर प्रदेशात काही विशिष्ट विधानसभा मतदारसंघांमध्ये, मतदारांची अनिर्बंध तपासणी आणि  मतदान करण्यापासून रोखण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेत, आयोगाने सखोल चौकशी अंती, मतदारांच्या तपासणीबाबत नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल,  मुरादाबाद, कानपूर आणि मुझफ्फरनगरमधील पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्व संबंधित डीईओ/एसपी जिल्हा निवडणूक अधिकारी / पोलीस अधीक्षक) आणि 13 केंद्रीय निरीक्षकांना, कोणत्याही समुदायाविरुद्ध कोणताही पक्षपात न करता, मुक्त, न्याय्य आणि निःपक्षपाती निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्याचे कठोर निर्देश दिले.

मागील राज्य आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील शहरी केंद्रांमध्ये कमी मतदानाचा कल पाहता, शहरी औदासीन्याचा सामना करण्यावर विशेष भर देण्यात आला.  उंच इमारती/ गृहनिर्माण संस्थामध्ये 1185 हून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली होती आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या निर्देशानुसार, मतदान केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या मतदारांना बसण्यासाठी बाकडी, स्वयंसेवक आणि चाक असलेल्या खुर्चीसह (व्हीलचेअर) सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.  शहरी आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी, वलयांकित मान्यवर चित्रपटकर्मी, इ सी आय- राज्य आणि राष्ट्रीय मान्यवर आदर्शवत व्यक्ती  यांचा समावेश असलेल्या, मतदानापूर्व विविध जनजागृती आणि जनसंघटनात्मक मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदान

महाराष्ट्रातील गडचिरोली आणि झारखंडमधील गिरिडीहसह दोन्ही राज्यांतील डाव्या विचारसरणीने (LWE) प्रभावित भागात मतदान सुव्यवस्थितपणे पार पडले. पहिल्यांदाच मतदानासाठी पात्र ठरलेले मतदार, वृद्ध मतदार, आदिवासी मतदार, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी काम करणारे कामगार मतदार, महिला मतदार, हातात मुले घेऊन आलेले मतदार, तृतीयपंथी मतदार, मतदारांची संपूर्ण कुटुंबे आणि वलयांकित मान्यवर मतदार यांसह समाजातील विविध घटकांतील मतदारांच्या लांबलचक रांगांनी मतदान केंद्रांवरील वातावरण वैशिष्ट्यपूर्ण बनले होते.शौचालय, रॅम्प, शेड, पिण्याचे पाणी यासह खात्रीशीर किमान सुविधांनी (AMF), मतदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय आरामात मतदान करता येईल याची हमी दिली.

मुंबईमध्‍ये सेलिब्रेटींनी म्हणजेच विविध क्षेत्रांमध्‍ये लोकप्रिय-प्रसिध्‍द असलेल्‍या व्‍यक्‍तींनी  मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि सर्वांनी आपली  जबाबदारी पार पाडावी, यासाठी  प्रोत्साहन दिले. क्रिकेटपटू आणि निवडणूक आयोगाचा ‘ब्रँड ॲम्‍बेसेडर’ असलेल्‍या  सचिन तेंडुलकर यांनी  आपल्या कुटुंबासह मतदान केले आणि इतरांनीही घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. मुंबईतील काही मतदान केंद्रांवर ज्येष्ठ मतदारांचे प्रमाणपत्र आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्‍ट्रात एकूण 288 विधानसभा जागांसाठी  4136 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर राज्यामध्‍ये  9.7 कोटींहून अधिक मतदार आहेत.

झारखंडमध्ये, 12 जिल्ह्यांमधील 38  विधानसभा मतदार संघांमध्‍ये  मोठ्या संख्येने मतदान झालेले दिसून आले. यंदा आयोगाने आदिवासी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न केले होते. त्यानुसार, नावनोंदणीपासून ते मतदान केंद्रापर्यंत त्‍यांना आणण्‍यासाठी  अनुकूल आणि स्वागतार्ह वातावरण तयार करण्‍यात आले. त्यामुळे आदिवासी मतदारांना मतदान केंद्रावर उपस्थित राहण्यास प्रोत्साहन मिळाले. दुस-या टप्‍प्‍यासाठी आदिवासी संस्कृती आणि घटकांचे प्रतिबिंब असलेल्या संकल्पनांवर  अनोख्या पद्धतीने 48 मतदान केंद्रे उभारण्यात आली  तसेच  ही मतदान केंद्रे  सुशोभित  करण्‍यात आली होती. निवडणुकीपूर्वी, राज्यातील 8 विशिष्‍ट  असुरक्षित आदिवासी गटा (पीव्‍हीटीजी) मधील 1.78 लाख सदस्यांची मतदार यादीत 100% नोंदणी सुनिश्चित करण्यात आली.

 

Voters in Jharkhand

देशातील वेगवेगळ्या राज्यातील 15 विधानसभा मतदारसंघात  आणि नांदेड लोकसभा मतदार संघामध्‍ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्‍यात आले. यामध्‍ये  उत्तर प्रदेशमधील  9 विधानसभा मतदार संघात  , पंजाबमधील 4,  उत्तराखंडमधील केदारनाथ विधानसभा मतदार संघ आणि केरळमधील एका – पलक्‍कड विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

या निवडणुकांमध्ये रोकड , अंमली पदार्थ आणि इतर प्रलोभने दाखवली जाऊ नयेत, यासाठी  विविध प्रकारे प्रयत्न सतत सुरू होते.  त्यासाठी अखंड दक्षता ठेवण्यात आली होती. निवडणूक काळात रोकड जप्तीच्या आकड्यांनी 1000 कोटी रूपयांचा  टप्पा ओलांडला आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जाहीर झाल्यापासून देशभरामध्‍ये  एकूण 1139 कोटी रूपये जप्‍त करण्‍यात आले.  झारखंड आणि महाराष्ट्रात,  जप्‍त करण्‍यात आलेली एकत्रित रक्कम  914.18 कोटी रूपये आहे. ही रक्कम  2019 मधील मागील निवडणुकांमध्ये नोंदवण्यात आलेल्या आकड्यांच्या 7.5 पट पेक्षा अधिक आहे. पैसा आणि  पदाची ताकद दाखवली जाऊ नये  आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाच्या सतत पर्यवेक्षणाखाली  पुनरावलोकनाच्या अंतर्गत अनेक नियम- कायद्यांची  अंमलबजावणी करण्‍यात यावी, यासाठी  परिपूर्ण समन्वय राखण्यात आला होता.

 

ECI national icon Sachin Tendulkar and Rajkummar Rao at a PS in Mumbai

निवडणूक काळात विविध प्रकारच्या परवानगी घेण्‍यासाठी  संबंधित खात्यांकडे   सुरळीत अर्ज  करता यावेत आणि  त्यांनी केलेल्या विनंतींवर प्रक्रिया करण्यासाठी अनेक ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान केले. ‘सुविधा 2.0’ ॲपवर मोहिमेशी संबंधित परवानगीसाठी 74,200 हून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील 55,700 आणि झारखंडमधील 11,932 अर्जांचा समावेश आहे. वापरकर्त्यांना आचारसंहितेची  उल्लंघनाची तक्रार करण्यास सक्षम करणा-या  सीव्हिजिल ॲपवर, या निवडणुकीत 24,992 तक्रारी करण्‍यात आल्या आहेत.या तक्रारींचे निराकरण 99% केले गेले. तर एकूण  20,741 तक्रारी या  100 मिनिटांमध्‍ये  सोडवण्यात आल्या.

Elderly voters at polling stations in Maharashtra and Jharkhand

महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 58.22% आणि झारखंडमध्ये 67.59% मतदान झाले. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी  मतदार रांगेत उभे  असलेल्या,  मतदान केंद्रांवर मतदानाची नियोजित वेळ संपल्यानंतरही  सुरू होते. मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी भौगोलिक/लॉजिस्टिक परिस्थितीच्या आधारे तसेच  वैधानिक कागदपत्रांची छाननी केल्यानंतर अधिकृतपणे मतदान बंद करतात आणि  मतदान केंद्रांवरून परततात. त्‍यावेळी   तात्पुरत्या स्‍वरूपात,  ढोबळ हिशेब लावून मतदान किती झाले याची  आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र त्यानंतर  ‘व्होटर टर्नआउट ॲप’ वर  विधानसभा मतदारसंघनिहार  सर्व माहिती अद्ययावत  केली जाणार आहे. तसेच जर  काही मतदान केंद्रांवर  फेरमतदान घेण्‍याविषयी  निर्णय झाला तर, त्यानुसार माहिती जाहीर केली जाणार आहे. मतदान संबंधित सर्व  भागधारकांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाच्यावतीने  आज रात्री पावणे बारा वाजता (रात्री 11.45 मिनिटांनी)  तात्पुरत्या मतदानाच्या आकडेवारीसह दुसरे प्रसिध्‍दी पत्रक जारी करणार आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार सर्व मतदार संघांमध्‍ये 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

District-Wise Approximate Voter Turnout in Maharashtra (5 PM)

Sl. No. Districts No. ACs Approximate Voter Turnout %
Ahmednagar 12 61.95
Akola 5 56.16
Amravati 8 58.48
Aurangabad 9 60.83
Beed 6 60.62
Bhandara 3 65.88
Buldhana 7 62.84
Chandrapur 6 64.48
Dhule 5 59.75
Gadchiroli 3 69.63
Gondia 4 65.09
Hingoli 3 61.18
Jalgaon 11 54.69
Jalna 5 64.17
Kolhapur 10 67.97
Latur 6 61.43
Mumbai City 10 49.07
Mumbai Suburban 26 51.76
Nagpur 12 56.06
Nanded 9 55.88
Nandurbar 4 63.72
Nashik 15 59.85
Osmanabad 4 58.59
Palghar 6 59.31
Parbhani 4 62.73
Pune 21 54.09
Raigad 7 61.01
Ratnagiri 5 60.35
Sangli 8 63.28
Satara 8 64.16
Sindhudurg 3 62.06
Solapur 11 57.09
Thane 18 49.76
Wardha 4 63.50
Washim 3 57.42
Yavatmal 7 61.22
Above  36 Districts 288 58.22

District-Wise Approximate Voter Turnout in Jharkhand Phase – 2 (5 PM)

Sl. No. Districts No. ACs Approximate Voter Turnout %
1 Bokaro 4 60.97
2 Deoghar 3 72.46
3 Dhanbad 6 63.39
4 Dumka 4 71.74
5 Giridih 6 65.89
6 Godda 3 67.24
7 Hazaribagh 1 64.41
8 Jamtara 2 76.16
9 Pakur 3 75.88
10 Ramgarh 1 71.98
11 Ranchi 2 72.01
12 Sahebganj 3 65.63
  Above  12 Districts 38 67.59

 

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेतील कॉप29 बैठकीदरम्यान भारताने हवामान बदलाचा स्वीकार या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील संवाद कार्यक्रमात निवेदन दिले

भारताने काल, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर …