मी आज रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमिर पुतीन यांच्या निमंत्रणावरून कझान येथे आयोजित 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.
जागतिक विकासाशी निगडित उद्दिष्टे, सुधारित बहुपक्षीयता, हवामान बदल, आर्थिक सहकार्य, लवचिक पुरवठा साखळीची निर्मिती, सांस्कृतिक बंध आणि नागरिकांच्या दृढ संबंधांना चालना देण्यासह अशा अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आणि विचारमंथन करण्यासाठी एक उदयोन्मुख मंच म्हणून ओळख प्राप्त केलेल्या ब्रिक्स समवेतच्या सहकार्याचा भारत आदर करत आहे. गेल्या वर्षी नवीन सदस्यांच्या समावेशासह झालेल्या ब्रिक्सच्या विस्तारामुळे जागतिक भल्यासाठी त्याच्या सर्वसमावेशकतेमध्ये आणि उद्दिष्टात भर पडली आहे.
मॉस्को येथे जुलै 2024 मध्ये झालेल्या वार्षिक शिखर परिषदेच्या अनुषंगाने, माझी कझान भेट भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करेल.
मी ब्रिक्स मधील इतर नेत्यांनाही भेटण्यास उत्सुक आहे.