बुधवार, नवंबर 27 2024 | 02:22:57 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / संविधान स्वीकृतीला 75 वर्षे झाल्याबद्दल राष्ट्रपतींच्या उपस्थितीत प्रमुख समारंभाचे आयोजन

संविधान स्वीकृतीला 75 वर्षे झाल्याबद्दल राष्ट्रपतींच्या उपस्थितीत प्रमुख समारंभाचे आयोजन

Follow us on:

देशाचे संविधान स्वीकृत करण्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (26 नोव्हेंबर 2024) संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की , 75 वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदना’च्या मध्यवर्ती सभागृहात संविधान सभेने नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासाठी संविधान तयार करण्याचे अतिभव्य कार्य पूर्ण केले.त्या दिवशी संविधान सभेच्या माध्यमातून आपण भारतातील जनतेने हे संविधान स्वीकारले, अधिनियमित केले आणि स्वतःला समर्पित केले.राष्ट्रपती म्हणाल्या की,आपले संविधान हा आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचा भक्कम पाया आहे.आपले संविधान आपली सामूहिक आणि वैयक्तिक प्रतिष्ठा सुनिश्चित करते.

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यावर सर्व नागरिकांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’साजरा केला,असे राष्ट्रपतींनी सांगितले.

आपल्या संविधानात प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहेत.भारताची एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे, समाजात एकोपा वाढवणे, महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि राष्ट्राला उच्च पातळीवर नेणे यांचा नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, राज्यघटनेची जी भावना आहे त्यानुसार सर्वसामान्य लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी कार्यपालिका, कायदे मंडळ आणि न्यायपालिका यांची एकत्रितपणे काम करण्याची जबाबदारी आहे. संसदेने बनवलेल्या अनेक कायद्यांमध्ये लोकांच्या आकांक्षा अभिव्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत सरकारने समाजातील सर्व घटकांच्या, विशेषत: दुर्बल घटकांच्या विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत,असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपली राज्यघटना हा एक जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे.  दूरदृष्टी असलेल्या आपल्या संविधान निर्मात्यांनी काळाच्या बदलत्या गरजांनुसार नवनवीन कल्पना अंगीकारण्याची तरतूद असलेली प्रणाली उपलब्ध केली. आपल्या संविधान निर्मात्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे दिशानिर्देश दिले होते. आज आपला देश एक आघाडीची अर्थव्यवस्था बनण्याबरोबरच ‘विश्वबंधू’ म्हणून ही भूमिका अतिशय उत्तमरित्या बजावत आहे.

सर्व नागरिकांनी आपल्या आचरणात घटनात्मक आदर्श आत्मसात करण्याचे, मूलभूत कर्तव्यांचे निर्वहन करण्याचे आणि  2047 पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याच्या राष्ट्रीय ध्येयाकडे समर्पित भावनेने अग्रेसर होण्याचे, आवाहन राष्ट्रपतींनी केले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

‘इफ्फिएस्टा:’ केंद्रीय संप्रेषण संस्थेने 55 व्या इफ्फीमध्ये भरले कला आणि संस्कृतीचे रंग, भारतभरातील 110 कलाकारांनी इफ्फी 2024 मध्ये केली कला सदर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयान्तर्गत सीबीसी म्हणजेच केंद्रीय संप्रेषण संस्थेने इफ्फी 2024 च्या निमित्ताने, इफ्फिएस्टा …