बुधवार, जनवरी 08 2025 | 11:57:18 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भारतीय उद्योग महासंघाच्या व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवहार पोर्टलचा प्रारंभ

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भारतीय उद्योग महासंघाच्या व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवहार पोर्टलचा प्रारंभ

Follow us on:

केंद्रीय वाणीज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज भारतीय व्यवसाय वातावरणातील अंतर्दृष्टी आणि  सुधारणांसाठी सूचना प्राप्त करण्याच्या आणि त्यांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवहार पोर्टलचा शुभारंभ केला. नवी दिल्लीत आयोजित केलेल्या व्यवसाय सुलभतेवर आधारित उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग(डीपीआयआयटी) आणि भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत हे पोर्टल सुरू करण्यात आले. सरकार आणि सीआयआय या दोघांकडूनही  व्यवसाय सुलभते संदर्भात राबवल्या जाणाऱ्या प्रमुख उपक्रमांची स्थिती आणि ताजी माहिती कळवण्याचा प्रयत्न या पोर्टलच्या माध्यमातून केला जाणार आहे.

समर्पित सदस्यांच्या डॅशबोर्डसह वापरकर्ते त्यांनी सादर केलेल्या सूचनांसंदर्भातील प्रगती आणि सादरीकरणे तात्काळ म्हणजेच रियल टाईम बेसिसवर पाहू शकतील, ज्यामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि समस्यांचे अर्थपूर्ण आणि कालबद्ध निराकरण सुनिश्चित होईल.

यावेळी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की केंद्र सरकारचा सहकारी संघवादावर विश्वास आहे आणि व्यवसायांसाठी अधिक चांगले आणि पोषक वातावरण आणि नागरिकांचे जीवन सुकर बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उद्योग आणि राज्य सरकारच्या सहभागींना त्यांनी काम करण्यासंदर्भातील नव्या कल्पना स्वीकारण्याचे आवाहन केले. मानसिकतेतील बदल आणि नव्या कल्पना स्वीकारण्याची इच्छाशक्ती या व्यवसायांची भरभराट करण्यासाठी परिणामकारक ठरतात असे त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांना त्यांच्या व्यवसायांच्या गरजांनुसार त्यांच्या मान्यता लक्षात घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सरकारच्या राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीला त्यांच्या शिफारशी आणि सूचनांची गरज आहे, असा पुनरुच्चार मंत्र्यांनी केला. जोपर्यंत उद्योग राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीचा वापर करणार नाही, तिच्या माध्यमातून परवाने मिळवणार नाही आणि त्यावर केंद्राला आणि औद्योगिक भूमी बँकेला ती अधिक चांगली बनवण्यासाठी अभिप्राय देणार नाहीत, तोपर्यंत हा उपक्रम यशस्वी होणार नाही, असे ते म्हणाले.

जनविश्वास 2.0 विधेयकावर त्यांनी सांगितले की सरकार आणखी 300 कायद्यांना गुन्हे वर्गातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे.  कायद्याच्या भावनेचा आदर करण्यासाठी सदस्यांना जागरुक करण्याचे आवाहन त्यांनी सीआयआयला केले. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन नफा कमावण्याची वृत्ती देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यवसाय सुलभतेला हानी पोहोचवणारी आहे , असे त्यांनी अधोरेखित केले. राज्य आणि केंद्र सरकारी पोर्टलमध्ये तांत्रिक अद्ययावतीकरणाच्या आवश्यकतेकडे त्यांनी लक्ष वेधले. तसे केले तरच ही पोर्टल त्वरेने प्रतिसाद देणारी,जलद, स्मार्ट आणि आधुनिक बनतील, असे त्यांनी सांगितले. चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आणि अशा समस्या असलेल्या क्षेत्रांचा शोध घेण्याचे आणि भारतभर प्रभाव निर्माण करणारे साधेसोपे बदल करण्याचे आवाहन त्यांनी उद्योगांना केले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …