शुक्रवार, जनवरी 10 2025 | 01:32:52 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने 9.39 कोटी रुपयांची आयटीसी फसवणूक करणाऱ्या करदात्याला केली अटक

सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने 9.39 कोटी रुपयांची आयटीसी फसवणूक करणाऱ्या करदात्याला केली अटक

Follow us on:

वस्तू आणि /किंवा सेवांच्या खरेदीशिवायच 9.39 कोटी रुपयांच्या अवैध आयटीसीचा लाभ  आणि लाभार्थी करदात्यांना 5.26 कोटी रुपयांचा बेकायदेशीर आयटीसी देण्यात  गुंतलेल्या एका व्यक्तीला सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने अटक केली. मुंबई विभागाच्या पालघर आयुक्तालयातील सीजीएसटी तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी,  वस्तू /किंवा सेवांचा अंतर्निहित पुरवठा न करता जीएसटी नोंदणी रद्द केलेले  करदाते आणि इतर पुरवठादारांकडून जारी इनव्हॉइसच्या आधारावर इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करण्यात गुंतलेल्या एका करदात्याला पकडले. फसवणूक करून प्राप्त केलेल्या आयटीसीची रक्कम 9.39 कोटी रुपये होती. उपरोक्त करदाता  वस्तू आणि/किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता वेगवेगळ्या लाभार्थी कंपन्यांना इनव्हॉइस जारी करून बेकायदेशीर आयटीसी लाभ प्राप्त करण्यात गुंतला होता. अशा प्रकारे लाभार्थी कंपन्यांना देण्यात आलेल्या अवैध आयटीसीची रक्कम 5.26 कोटी रुपये होती.

करदात्याच्या व्यवसायाच्या मुख्य ठिकाणावर आणि निवासस्थानी राबवलेल्या  व्यापक शोध मोहिमेच्या आधारे, गुन्हयातील दस्तऐवज/रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले.  त्यावरून समान कार्यपद्धती वापरणाऱ्या टोळीचा हा करदाता एक सदस्य असावा, असे सूचित होते.

सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 70 अन्वये नोंदवलेल्या वक्तव्यामध्ये, करदात्याने वर नमूद केल्याप्रमाणे  बेकायदेशीर आयटीसीचा लाभ घेतल्याचे आणि लाभार्थी कंपन्यांना तो पुरवल्याचे मान्य केले आहे. शोध आणि पुढील तपासादरम्यान गोळा केलेल्या प्रत्यक्ष  पुराव्यांच्या आधारे, सीजीएसटी  कायदा,2017 च्या कलम 69 च्या तरतुदीनुसार सीजीएसटी कायदा, 2017 चे  कलम 132(1)(b) आणि कलम 132(1)(c) चे उल्लंघन केल्याबद्दल 27.11. 2024 रोजी या करदात्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.  मुंबई  येथील सीएमएम  न्यायालयाने करदात्यास 10.12.2024 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली  आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …