शनिवार, नवंबर 30 2024 | 09:22:49 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजांसंदर्भात प्रसिद्धी पत्रक

2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजांसंदर्भात प्रसिद्धी पत्रक

Follow us on:

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या  (एनएसओ),  प्रसिद्धी पत्रकात, आर्थिक वर्ष 2024 -25 च्या जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या  तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचे त्याच्या खर्चाच्या स्थिरांक (2011-12) आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह त्रैमासिक अंदाज जारी करत आहे.

वर्ष दर वर्ष टक्केवारीतील बदलांसह आर्थिक व्यवहारांच्या आधारे आणि आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24 आणि 2024-25 साठी स्थिरांक आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह सकल मूल्यवर्धितांचे तिमाही आणि अर्ध-वार्षिक(एप्रिल-सप्टेंबर) अंदाज परिशिष्ट अ च्या 1 ते 8 निवेदनात दिले आहेत.

ठळक वैशिष्ट्ये:

  • वास्तविक जीडीपी आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाही मधील 8.1% वाढीच्या दरापेक्षा 2024-25 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये 5.4% ने वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन (2.2%) आणि खाणकाम आणि उत्खनन (-0.1%) क्षेत्रांमध्ये मंदगतीची वाढ दिसून आली असली तरी, पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) मध्ये वास्तविक जीव्हीए ने 6.2% वाढ नोंदवली आहे.
  • वास्तविक जीव्हीए मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमधील 7.7% वृद्धीदराच्या तुलनेत 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 5.6% वाढला आहे.
  • आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 3.5% वाढीचा दर नोंदवून कृषी आणि संलग्न क्षेत्राने पुन्हा उसळी घेतली आहे.

Fig. 1: 2021-22 या आर्थिक वर्षाची पहिली तिमाही ते 2024-25 या आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही मधील वर्ष दर वर्ष वृद्धी दरांसह स्थिरांकी दरांवर  तिमाही जीडीपी आणि जीव्हीए अंदाज

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी विज्ञान संप्रेषण अतिशय महत्त्वाचे आहे- डॉ. जितेंद्र सिंह

प्रभावी विज्ञान संप्रेषणावर भर देत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);  डॉ. जितेंद्र सिंह यांनी …