बुधवार, सितंबर 09 2026 | 09:46:47 PM

2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजांसंदर्भात प्रसिद्धी पत्रक

Saransh Kanaujia
Saransh Kanaujia - Editor
2 Min Read

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या  (एनएसओ),  प्रसिद्धी पत्रकात, आर्थिक वर्ष 2024 -25 च्या जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या  तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचे त्याच्या खर्चाच्या स्थिरांक (2011-12) आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह त्रैमासिक अंदाज जारी करत आहे.

वर्ष दर वर्ष टक्केवारीतील बदलांसह आर्थिक व्यवहारांच्या आधारे आणि आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24 आणि 2024-25 साठी स्थिरांक आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह सकल मूल्यवर्धितांचे तिमाही आणि अर्ध-वार्षिक(एप्रिल-सप्टेंबर) अंदाज परिशिष्ट अ च्या 1 ते 8 निवेदनात दिले आहेत.

ठळक वैशिष्ट्ये:

  • वास्तविक जीडीपी आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाही मधील 8.1% वाढीच्या दरापेक्षा 2024-25 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये 5.4% ने वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन (2.2%) आणि खाणकाम आणि उत्खनन (-0.1%) क्षेत्रांमध्ये मंदगतीची वाढ दिसून आली असली तरी, पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) मध्ये वास्तविक जीव्हीए ने 6.2% वाढ नोंदवली आहे.
  • वास्तविक जीव्हीए मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमधील 7.7% वृद्धीदराच्या तुलनेत 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 5.6% वाढला आहे.
  • आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 3.5% वाढीचा दर नोंदवून कृषी आणि संलग्न क्षेत्राने पुन्हा उसळी घेतली आहे.

Fig. 1: 2021-22 या आर्थिक वर्षाची पहिली तिमाही ते 2024-25 या आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही मधील वर्ष दर वर्ष वृद्धी दरांसह स्थिरांकी दरांवर  तिमाही जीडीपी आणि जीव्हीए अंदाज

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

 

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

Related Post

Share This Article
Follow:
लेखक वर्ष 2011 से पत्रकारिता के क्षेत्र में सक्रिय हैं। अब तक वे इतिहास से जुड़ी चार पुस्तकों का लेखन कर चुके हैं—‘भारत : 1857 से 1957 इतिहास पर एक दृष्टि’, ‘भारत : 1885 से 1950 इतिहास पर एक दृष्टि’, ‘गाँधी जी की राजनीतिक यात्रा के कुछ पन्ने’ और ‘1857 का स्वतंत्रता समर – कारण से परिणाम तक’। पत्रकारिता के क्षेत्र में वे विशेष रूप से राजनीति, अर्थव्यवस्था, सामाजिक विषयों और आध्यात्म से जुड़े समाचारों एवं विषयों पर लेखन करते रहे हैं। वर्षों के पत्रकारिता अनुभव और विभिन्न विषयों पर निरंतर लेखन के माध्यम से उन्होंने समसामयिक घटनाओं के साथ-साथ ऐतिहासिक, सामाजिक और आध्यात्मिक विषयों को भी पाठकों तक पहुँचाने का प्रयास किया है।