रविवार, नवंबर 24 2024 | 10:06:43 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / राष्ट्रीय एकता दिवसाच्या आदल्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

राष्ट्रीय एकता दिवसाच्या आदल्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

Follow us on:

राष्ट्रीय एकता दिवसाच्या आदल्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज निर्माण भवन येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मेळावा घेतला आणि देशाची एकता आणि अखंडता बळकट करण्यासाठी शपथ दिली. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.  आपल्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाने देशाला एकसंध बांधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचे पुण्यस्मरण करणे,  हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी, एकी असलेला प्रगतीशील समाज घडवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेच्या महत्त्वावर भर दिला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि  आपल्या सर्व उपक्रमांमध्ये एकता आणि समानतेची तत्त्वे जपणे सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

व्यापार व आर्थिक भागीदारी कराराच्या (टीईपीए) अंमलबजावणीसाठी केंद्रीय वाणिज्य सचिवांची नॉर्वे भेट

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभाग सचिव सुनील बर्थवाल यांच्यासह विभागाच्या अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी …