शनिवार, नवंबर 23 2024 | 06:54:53 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / राष्ट्रपतींनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील यशस्वी महिला अधिकाऱ्यांबरोबर साधला संवाद

राष्ट्रपतींनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील यशस्वी महिला अधिकाऱ्यांबरोबर साधला संवाद

Follow us on:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 4 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपती भवनात भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील यशस्वी महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जनतेबरोबर दृढ संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करणे हा उद्देश असेलल्या “द प्रेसिडेंट विथ द पीपल” या उपक्रमाअंतर्गत ही भेट झाली.

भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महिला विविध परिचालन व तांत्रिक बाबतीत महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे राष्ट्रपती या प्रसंगी म्हणाल्या. हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) जबाबदारी पार पाडणाऱ्या 15 टक्के महिला आहेत,तर 11 टक्के फ्लाईट डिस्पॅचर्स व 9 टक्के एरोस्पेस इंजिनिअर्स या महिला आहेत असे  निरीक्षण राष्ट्रपतींनी नोंदवले. गेल्या वर्षी वाणिज्यिक उड्डाण परवाने मिळालेल्या  वैमानिकांपैकी 18 टक्के महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. नवनवीन वाटा चोखाळण्याचे धैर्य दाखवणाऱ्या व नवीन कल्पना राबवणाऱ्या या  यशस्वी महिलांचे त्यांनी कौतुक केले.

भारत सरकारच्या  सर्वसमावेशक  प्रयत्नांमुळे नागरी विमान वाहतूक  क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीला पाठबळ मिळाल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. अधिकाधिक महिला करियरसाठी आता विमान वाहतूक क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. उड्डाण क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागासोबतच त्यांना समान संधी मिळणे हे देखील महत्वाचे असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

योग्य शिक्षण व प्रशिक्षणासोबत कुटुंबाचा पाठिंबादेखील आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. अनेक उच्चशिक्षित  महिला केवळ कुटुंबाचा पाठिंबा नसल्यामुळे करियरची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत असे दिसून येते. त्यांनी या यशस्वी महिलांना इतर महिलांना  करियरची निवड तसेच प्रगतीसाठी मार्गदर्शन करून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे  आवाहन केले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

वर्ष 2022 आणि 2023 साठी एकूण 82 तरूण कलाकारांना उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार प्रदान

विविध कला क्षेत्रांमध्‍ये उत्कृष्‍ट कला प्रदर्शन करणा-या 82 युवा कलाकारांना वर्ष 2022 आणि 2023साठी  उस्ताद …