पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत,असे पंतप्रधान म्हणाले.श्रद्धेचे महान पर्व असणाऱ्या छठ या सणाशी संबंधित त्यांची सुमधुर गाणी नेहमीच स्मरणात राहतील,असेही पंतप्रधान म्हणाले.
X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा जी यांच्या निधनाने अतिव दुःख झाले. त्यांनी गायलेली मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत लोकप्रिय आहेत.श्रद्धेचे महान पर्व असलेल्या छठ सणाशी संबंधित त्यांच्या सुमधुर गीतांचे गुंजन कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. दुःखाच्या या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चहात्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.ओम शांती!”