गुरुवार, नवंबर 14 2024 | 10:00:24 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / एनएचपीसी आणि एनटीपीसी’च्या 50 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी केले संबोधित

एनएचपीसी आणि एनटीपीसी’च्या 50 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी केले संबोधित

Follow us on:

एनएचपीसी ही भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनी तर एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा उपयोगिता संस्था, यांनी 9 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आपला 50 वा स्थापना दिवस साजरा करत सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश केला. 7 नोव्हेंबर 1975 रोजी स्थापन करण्यात आलेल्या या दोन्ही संस्थांसाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.

केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ऊर्जा विभागाचे सचिव पंकज अग्रवाल या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते. एनएचपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर.के. चौधरी आणि एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी आपल्या भाषणात दोन्ही संस्थांचे हार्दिक अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक प्रसंगाचा भाग होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  भारतीय ऊर्जा क्षेत्रात एनएचपीसी आणि एनटीपीसीने गेल्या पाच दशकांमध्ये दिलेले अतुलनीय योगदान आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.  स्थिर आणि अखंड वीज पुरवठा देण्यासाठी त्यांचे समर्पण आणि वचनबद्धता देशाच्या शाश्वत विकासात महत्त्वपूर्ण ठरली आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी या कार्यक्रमात एनएचपीसीचे कॉमिक बुक, “जल से ज्योती” आणि एनटीपीसीचे कॉफी टेबल बुक “समत्वम्” या दोन विशेष पुस्तकांचे प्रकाशन केले. मुलांना जलविद्युत निर्मितीचे महत्त्व आणि प्रक्रियेबद्दल आकर्षक कथाकथन आणि जीवंत चित्रांद्वारे शिक्षित करणे हे “जल से ज्योती” या एनएचपीसीच्या कॉमिक बुकचे उद्दिष्ट आहे.  तर एनटीपीसीचे कॉफी टेबल बुक, “समत्वम्” हे विस्मयकारक दृश्य आणि प्रेरणादायी कथांद्वारे एनटीपीसीच्या समृद्ध इतिहासाचे वर्णन करते.  “समत्वम्” हा संस्कृत शब्द असून त्याचा  अर्थ समता आणि समतोल असा आहे. या पुस्तकात गेल्या 50 वर्षांतील एनटीपीसीचे तत्वज्ञान अंतर्भूत आहे.  या पुस्तकात एनटीपीसीच्या पहिल्या औष्णिक उर्जा प्रकल्पापासून भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक उर्जा केंद्र बनण्यापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकात ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणीय शाश्वतता, नवोन्मेष, समुदाय सशक्तीकरण आणि जैवविविधता यामधील एनटीपीसीचे योगदानही दर्शविले आहे.

प्रख्यात पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते.  त्यांच्या मनमोहक सुरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि या सोहळ्याची रंगत वाढवली.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे पोंडा आणि मडगाव येथे डिजिटल जीवन प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या (DoPPW) वतीने 11 नोव्हेंबर 2024 रोजी स्टेट बँक …