गुरुवार, नवंबर 14 2024 | 10:51:43 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे पोंडा आणि मडगाव येथे डिजिटल जीवन प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे पोंडा आणि मडगाव येथे डिजिटल जीवन प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन

Follow us on:

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या (DoPPW) वतीने 11 नोव्हेंबर 2024 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोंडा आणि मडगाव येथील मुख्य शाखांमध्ये डिजिटल जीवन  प्रमाणपत्र (डीएलसी)शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पेन्शनधारकांना त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विविध डिजिटल पद्धती वापरण्यास मदत करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी या शिबिरांना भेट दिली.

या विभागाच्या वतीने सोमवारी पणजी येथील सचिवालयात आणि म्हापसा येथील स्टेट बँकेच्या शाखांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली. DoPPW ने पेन्शनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी देशभर डीएलसी  3.0 मोहीम सुरू केली आहे. भारतातील 800 शहरांमध्ये  एक ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत  डीएलसी  3.0 मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेच्या प्रमुख भागीदारांमध्ये बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, पेन्शनधारकांच्या संघटना, UIDAI, MeitY, संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि दूरसंचार विभाग यांचा समावेश आहे. पेन्शनधारकांना डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्रे सादर करण्यास सहाय्य करण्यासाठी सर्व  शहरांमध्ये शिबिरे घेतली जात आहेत तसेच अतिशय वयोवृद्ध किंवा विकलांग पेन्शनधारकांसाठी गृहभेटीसह विशेष व्यवस्था केली जात आहे.

दुर्गम भागातील किंवा मर्यादित हालचाल करू शकणाऱ्या पेन्शनधारकांनाही या सुविहित आणि सुलभ प्रणालीचा लाभ मिळेल याची खबरदारी घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

“कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी” केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण’ कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल …