गुरुवार, नवंबर 21 2024 | 03:46:07 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / लष्‍कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नेपाळच्या दौऱ्यावर

लष्‍कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नेपाळच्या दौऱ्यावर

Follow us on:

लष्‍कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, आजपासून नेपाळच्‍या दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा हा दौरा 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील घनिष्ठ संरक्षण सहकार्याला आणखी बळ देण्यासाठी  लष्‍कर प्रमुखांचा हा दौरा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे सांगितले जाते.

20 नोव्हेंबर 2024 रोजी जनरल उपेंद्र द्विवेदी नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधतील आणि त्यानंतर शशी भवन येथे नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिगडेल यांच्याशी अनौपचारिक चर्चा करतील.

21 नोव्हेंबर 2024 रोजी, लष्‍कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना नेपाळी लष्कराच्या मुख्यालयात मानवंदना  देण्यात येईल आणि त्यानंतर ते  नेपाळी लष्कराशी संवाद साधणार आहेत. नेपाळच्‍या लष्‍करातील  मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक   समान हिताच्या मुद्द्यांवर जनरल उपेंद्र द्विवेदी यांना माहिती देतील. त्यानंतर, ते राष्ट्रपती भवन, शीतल निवास येथे आयोजित समारंभाला उपस्थित राहतील.या कार्यक्रमामध्ये भारतीय लष्कर आणि नेपाळी लष्कर यांच्यातील अनोख्या परंपरेनुसार, नेपाळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना नेपाळी लष्कराचे मानद जनरलपद प्रदान केले जाईल. यावेळी भारताचे लष्‍करप्रमुख  नेपाळच्या  राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दोघांमध्‍ये भारत आणि नेपाळमधील संरक्षण भागीदारी आणखी वाढवण्यासंबंधी  चर्चा होईल.  यानंतर संध्याकाळी  नेपाळी लष्कराने आयोजित केलेल्या मेजवानीला ते उपस्थित राहतील.

22 नोव्हेंबर 2024 रोजी, जनरल उपेंद्र द्विवेदी  नेपाळी आर्मी कमांड अँड स्टाफ कोर्स, शिवपुरीच्या विद्यार्थी,  अधिकाऱ्यांना संबोधित करतील. दिवसभरात, जनरल उपेंद्र द्विवेदी नेपाळचे पंतप्रधान  केपी शर्मा आणि नेपाळचे सरंक्षण मंत्री  मनबीर राय,  यांची भेट घेतील आणि परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.

23 नोव्हेंबर 2024 रोजी, जनरल उपेंद्र द्विवेदी पोखरा येथे माजी सैनिकांच्या रॅलीत सहभागी होतील. यावेळी त्यांच्‍या हस्‍ते  वीर नारी आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्‍यात येणार आहे. रॅलीदरम्यान, ते नेपाळमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय लष्करातील माजी सैनिकांशी संवाद साधतील. जनरल द्विवेदी  नेपाळी सैन्याच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी नेपाळच्‍या पश्चिम विभागाचे जनरल यांच्यासमवेत ते उपस्थित  नेपाळी सैन्याला   लष्‍करविषयक माहिती देणार आहेत.  संध्याकाळी, जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या सन्मानार्थ काठमांडू येथे मान्यवरांसाठी मेजवानीचे आयोजन करण्‍यात आले आहे. जनरल द्विवेदी  24 नोव्हेंबर 2024 रोजी मायदेशी परतणार आहेत.

जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारत आणि नेपाळच्या लष्करांमधील  सहकार्य मजबूत करणे आणि दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्य वृध्‍दीचे  नवीन मार्ग शोधणे हा आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेतील कॉप29 बैठकीदरम्यान भारताने हवामान बदलाचा स्वीकार या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील संवाद कार्यक्रमात निवेदन दिले

भारताने काल, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर …