देशाची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक, महारत्न कंपनी भारतीय पोलाद प्राधिकरणाने (सेल) मुंबईतील जागतिक जॉन कॉकरिल ग्रुपची भारतीय शाखा जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड (JCIL) सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. नवोन्मेष आणि शाश्वतता याबाबतचा समान दृष्टिकोन, व्यापक उद्योग कौशल्य, अद्ययावत तंत्रज्ञान यासह दोन कंपन्यांच्या एकत्रित सामर्थ्याचा लाभ घेणे, हे या सामंजस्य करारामागचे …
Read More »2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजांसंदर्भात प्रसिद्धी पत्रक
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ), प्रसिद्धी पत्रकात, आर्थिक वर्ष 2024 -25 च्या जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचे त्याच्या खर्चाच्या स्थिरांक (2011-12) आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह त्रैमासिक अंदाज जारी करत आहे. वर्ष दर वर्ष टक्केवारीतील बदलांसह आर्थिक व्यवहारांच्या आधारे आणि आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24 आणि 2024-25 साठी स्थिरांक आणि वर्तमान दर या …
Read More »मुंबईत आयोजित देशभरातील प्रमुख बंदरांच्या सचिवांच्या परिषदेचे जेएनपीएने भूषवले यजमानपद
देशात सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने मुंबईत 29 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित देशभरातील प्रमुख बंदरांच्या सचिवांच्या परिषदेचे यजमानपद भूषवले. दोन दिवसांच्या या परिषदेने बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख बंदरांच्या प्रतिनिधींना एकत्र आणले. या परिषदेचे उदघाटन जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ (आयआरएस ) यांनी …
Read More »शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी विज्ञान संप्रेषण अतिशय महत्त्वाचे आहे- डॉ. जितेंद्र सिंह
प्रभावी विज्ञान संप्रेषणावर भर देत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ. जितेंद्र सिंह यांनी शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विज्ञानविषयक माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विज्ञान विशेष पत्रकारिता आणि विज्ञान विशेषज्ञ पत्रकार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. मंगलम स्वामिनाथन राष्ट्रीय उत्कृष्टता …
Read More »केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीचे केले आयोजन
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्लीतील कृषी भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) च्या अंमलबजावणी आणि कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. केंद्रीय मंत्री यांनी योजनेचा प्रभाव वाढवण्यासाठी नवकल्पना आणि सुधारणा करण्या बाबतच्या महत्त्वावर जोर दिला, तसेच योजनेच्या यशाची प्रशंसा केली. त्यांनी पुढे निर्देश दिले की …
Read More »सोलापूर शहर राजभाषा अंमलबजावणी समितीची सहामाही बैठक संपन्न
सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय कार्यालयांमध्ये राजभाषा हिंदीच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजभाषा अंमलबजावणी समितीतर्फे सहामाही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, राजेंद्र प्रसाद वर्मा, सहायक संचालक, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, संजीव कुमार, अध्यक्ष, नार्कस, नीरज कुमार डोहरे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, तपन कुमार बंदोपाध्याय, मुख्य महाव्यवस्थापक, एनटीपीसी आणि विनय प्रसाद साव, सदस्य सचिव उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय कार्यालयांत राजभाषेच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी भुवनेश्वरमध्ये ओदिशा येथे पोलिस महासंचालक/पोलिस महानिरीक्षकांच्या 59 व्या परिषदेचे केले उद्घाटन
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज भुवनेश्वरमध्ये ओदिशा येथे पोलिस महासंचालक/पोलिस महानिरीक्षकांच्या 59 व्या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. या परिषदेचे आयोजन हायब्रिड स्वरुपात होत असून सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक/ पोलिस महानिरीक्षक आणि सीएपीएफ/सीपीओंचे प्रमुख यामध्ये प्रत्यक्ष …
Read More »सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने 9.39 कोटी रुपयांची आयटीसी फसवणूक करणाऱ्या करदात्याला केली अटक
वस्तू आणि /किंवा सेवांच्या खरेदीशिवायच 9.39 कोटी रुपयांच्या अवैध आयटीसीचा लाभ आणि लाभार्थी करदात्यांना 5.26 कोटी रुपयांचा बेकायदेशीर आयटीसी देण्यात गुंतलेल्या एका व्यक्तीला सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने अटक केली. मुंबई विभागाच्या पालघर आयुक्तालयातील सीजीएसटी तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी, वस्तू /किंवा सेवांचा अंतर्निहित पुरवठा न करता जीएसटी नोंदणी रद्द केलेले करदाते आणि इतर पुरवठादारांकडून …
Read More »भीष्म (335 यार्ड) आणि बाहुबली(336 यार्ड) या 25 टी बोलार्ड पुल टग्जचा नौदलाच्या सेवेत समावेश
भीष्म (335 यार्ड) आणि बाहुबली(336 यार्ड) या 25 टी बोलार्ड पुल टग्जचा 28 नोव्हेंबर 2024 रोजी नौदलाच्या जहाज दुरुस्ती यार्डात झालेल्या कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत समावेश करण्यात आला. अंदमान निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ एयर मार्शल साजू बालकृष्णन या कार्य्रक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 25 टी बीपी प्रकारातल्या सहा टग्जची बांधणी आणि पुरवठा यासाठी कोलकात्याच्या मेसर्स टिटागड रेल सिस्टिम्स लि. सोबत 12 नोव्हेंबर 21 रोजी करार …
Read More »पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद ही दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 अशी तीन दिवस चालणार असून यामध्ये नवीन फौजदारी कायदे, दहशतवादाला प्रतिबंध, …
Read More »