नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात संथाली भाषेमधील भारतीय राज्य घटनेचे प्रकाशन केले. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. या प्रकाशनामुळे भारतीय राज्यघटना आता ‘ओल चिकी’ लिपी आणि संथाली भाषेत उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संथाली भाषिकांसाठी ही अभिमानाची …
Read More »नवी दिल्लीत कृत्रिम बुद्धीमत्ता उत्क्रांतीवरील राष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाद्वारे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि आउटलुक मासिकाच्या सहयोगाने आयोजित ‘एआय इवोल्युशन -द महाकुंभ ऑफ एआय’ (एआय उत्क्रांती – एआयचा महाकुंभ) या प्रमुख राष्ट्रीय परिषदेला आज उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतची मार्गदर्शिका’ केली प्रकाशित
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) तयार केलेल्या ‘रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यावरील मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले. बीआरओ, देशातील काही अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये महामार्ग आणि मोक्याच्या रस्त्यांचे बांधकाम …
Read More »उपराष्ट्रपतींनी भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) च्या 2023 आणि 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे देश वाटचाल करत असताना, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात सनदी अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी अमृत …
Read More »जागतिक आरोग्य हस्तक्षेप मानकांमध्ये आयुष प्रणाली एकीकृत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांची नवी दिल्लीत झाली महत्त्वाची तांत्रिक बैठक
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025. परंपरागत आरोग्यसेवेच्या जागतिक एकात्मतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक औषधोपचार हस्तक्षेप मानकांच्या विकासासाठी 20–21 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल इम्पिरियल, येथे दोन दिवसांची तांत्रिक प्रकल्प बैठक आयोजित केली. हा उपक्रम मूलतः आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात 24 मे 2025 …
Read More »दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत रबी क्षेत्रावर झालेल्या लागवडीची आकडेवारी
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 19 डिसेंबर 2025 पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेल्या प्रगतीची माहिती जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये रबी पिकांच्या लागवड क्षेत्रात 8 लाख हेक्टरची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील …
Read More »पेयजल आणि स्वच्छता विभागाने 8 राज्यांमधील 8 ग्रामपंचायत मुख्यालय असलेल्या गावांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेत बहुभाषिक सुजल ग्राम संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचे केले आयोजन
जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने आज ‘सुजल ग्राम संवाद’ची दुसरी आवृत्ती यशस्वीपणे आयोजित केली, ज्यामुळे सहभागी जल प्रशासन आणि जल जीवन मिशनच्या समुदाय-नेतृत्वाखालील अंमलबजावणीप्रती केंद्र सरकारच्या वचनबद्धतेला पुष्टी मिळाली. या आभासी संवादात ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, ग्राम जल आणि स्वच्छता समितीचे सदस्य, समुदाय प्रतिनिधी, महिला बचत गट आणि आघाडीचे कार्यकर्ते तसेच जिल्हाधिकारी/उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी …
Read More »संसदेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित
सोमवार 1 डिसेंबर, 2025 रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवार 19 डिसेंबर, 2025 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. या अधिवेशनात 19 दिवसांमध्ये 15 बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत 10 विधेयके सादर करण्यात आली आणि लोकसभेने 8 विधेयके मंजूर केली. राज्यसभेनेही 8 विधेयके संमत केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मिळून एकूण 8 विधेयके मंजूर …
Read More »पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू असलेल्या पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सहभागी होणार आहेत. या समारोप समारंभादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. हा कार्यक्रमातून जागतिक, विज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित पारंपारिक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे केले स्वागत, देशाच्या अदम्य शूरवीरांना दिलेली ही मानवंदना
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे स्वागत केले आहे. या गॅलरीत प्रदर्शित केलेली चित्रे देशाच्या अदम्य शूरवीरांना मनापासून अर्पण केलेली आदरांजली अजून त्यांच्या बलिदानाबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्रे त्या शूर योद्ध्यांचा सन्मान करतात,ज्यांनी आपल्या सर्वोच्च त्यागाने मातृभूमीचे रक्षण केले. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi