शुक्रवार, जनवरी 10 2025 | 09:25:47 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला

कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला

Follow us on:

गोवा इथे भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) चा एका भव्य सोहळ्यात नुकताच समारोप झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) सादर केलेल्या फिल्म बाजार 2024 मध्ये नव्या पिढीच्या चित्रपट कथाकारांची सर्वांनीच प्रशंसा केली. ‘स्क्रीनरायटर्स लॅब’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ‘कोन्याक’ या चित्रपटाची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. स्क्रीनरायटर्स लॅब च्या पुरस्कारामुळे ‘कोन्याक’ या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाच्या पटकथेवर आधारित 100 कोटी रुपयांच्या खर्चाचा नवा चित्रपट काढण्यासाठी चित्रनिर्मात्यांनी तयारी दर्शवली आहे. उद्धव घोष लिखित ‘कोन्याक’ हा पंकज कुमार यांचा दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील पहिलाच प्रयत्न आहे. ‘तुंबाड’ या चित्रपटासाठी  सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेल्या पंकज कुमार यांनी ‘कोन्याक’ या चित्रपटाद्वारे त्यांचे कथाकथनाचे कौशल्य प्रेक्षकांसमोर आणले आहे.

“कोन्याक ही केवळ एक गतिमान चित्रकथा नव्हे तर नागालँड च्या निबिड निसर्गाचे भयकारी रुप दर्शवणारा तसेच तिथल्या जनसमुदायाच्या प्रथा, परंपरा, लोककथा यांना मूर्त रूप द्यायचा एक प्रयत्न आहे. या चित्रपटाद्वारे तिथल्या दुर्गम व अस्पर्श प्रदेशाचे जिवंत चित्रण प्रेक्षकांपुढे आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” असे पंकज कुमार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पटकथा तज्ज्ञ क्लेअर डोबीन यांनी या चित्रपटाच्या पटकथेसाठी मार्गदर्शन केले असून कोन्याक हा चित्रपट प्रेक्षकांना त्या प्रदेशाची सांस्कृतिक डूब देत मनुष्याच्या चिकाटी, जिद्द तसेच विपरिततेवर मात करत सन्मानाने जगण्याची वृत्ती यावर प्रकाश टाकतो.

कोन्याक या अपरिचित जमातीच्या लोकांची ही अविस्मरणीय कथा विश्वासघातासोबतच त्यांच्या  शौर्य व विजिगिषु वृत्तीचे हृद्य दर्शन घडवते, या शब्दात स्क्रीनरायटर्स लॅब च्या मार्गदर्शक क्लेअर यांनी या चित्रपटाच्या पटकथेची  प्रशंसा केली. नागालँडच्या या कोन्याक जमातीच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक मुळांना धक्का न लावता त्यांच्या लोककथांचा वापर करत एक गतिमान पटकथा देण्यासाठी लॅब ने पंकज कुमार यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. समृद्ध सांस्कृतिक परंपरा, स्वप्नवत वास्तवचित्रण, व ओघवती कथा घेऊन येणारा हा चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास सज्ज आहे. यामधून भारतीय चित्रपटांना जागतिक दर्जापर्यंत पोचवण्यासाठीची फिल्म बाजार सारख्या उपक्रमांच्या  भूमिकेचे  महत्व अधोरेखित होते.

फिल्म बाजार 2024 मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) पटकथा लेखक प्रयोगशाळेतील इतर पटकथालेखकांच्या साहित्यकृतींमध्येही वाढते स्वारस्य दिसून आले. यावेळी आघाडीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांचे लक्ष अनेक पटकथांकडे वेधले गेले यातूनच प्रतिभावंत सर्जकांच्या प्रतिभेची बाजारपेठेतील मागणीशी सांगड घालण्याचे प्रयोगशाळेचे सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतात.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पटकथा लेखक प्रयोगशाळेबद्दल:

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) ला या वर्षी 21 राज्यांमधून 150 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या,  त्यापैकी 6 प्रकल्पांची एनएफडीसी पटकथा लेखक प्रयोगशाळेच्या 18 व्या आवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. देशभरातील प्रतिभावंतांना हेरून त्यांचा विकास करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हे सहा पटकथा लेखक जाहिराती,  लघुपट, कादंबरी,  माहितीपट आणि चित्रपटांचे निर्माते –दिग्दर्शक आहेत. त्यांनी हिंदी, उर्दू, पहाडी, पंजाबी, आसामी, मल्याळम, कोन्याक, इंग्रजी आणि मैथिली सह अनेक भाषांमध्ये पटकथा लिहिल्या आहेत.

एनएफडीसी पटकथालेखक प्रयोगशाळा 2024 साठी निवडलेले 6 प्रकल्प  तुम्ही येथे पाहू शकता.

वर्ष 2007 पासून फिल्म बाजार विभागात समाविष्ट करण्यात आलेला एनएफडीसी पटकथालेखक प्रयोगशाळा हा एक महत्वपूर्ण उपक्रम असून, उदयोन्मुख प्रतिभावंतांना नावाजलेले पटकथाकार आणि उद्योगातील तज्ञांकडून मार्गदर्शन देऊन त्यांना अधिक समृद्ध करण्यात तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जागतिक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत कथा पोहोचवणे आणि पटकथाकारांना स्वतःची ओळख प्राप्त करून त्यांना पाठबळ मिळावे यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे यावर या उपक्रमाचा भर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रयोगशाळेतील अनेक चित्रपटांना समीक्षकांची कौतुकाची थाप मिळाली असून त्यांना व्यावसायिक यश देखील मिळाले आहे. कोन्याक त्याच पावलावर पाऊल ठेऊन पुढे जाण्यासाठी सिद्ध आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …