शुक्रवार, जनवरी 10 2025 | 12:56:49 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीच्या (आयसीएआर) शताब्दी सोहळ्यात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले मार्गदर्शन

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीच्या (आयसीएआर) शताब्दी सोहळ्यात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले मार्गदर्शन

Follow us on:

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज आयसीएआर- भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होत शताब्दी पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. चौहान म्हणाले, “जेव्हा 100 वर्षांपूर्वी 1924 मध्ये ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली, त्यावेळी कदाचित कापसामधून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा एकमेव उद्देश होता. त्यावेळी त्यांची स्वतःची काही ध्येय व उद्दिष्टे होती. पण आज आपले ध्येय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडवणे.

“एक तेजस्वी, समृद्ध, संपन्न भारत शेतकऱ्यांशिवाय तयार होऊ शकत नाही. आजही कृषी हा व्यवसाय भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी या व्यवसायाचा आत्मा आहेत,” असे ते म्हणाले. चौहान पुढे म्हणाले, “मंत्री म्हणून शेतकऱ्यांची सेवा करणे हे माझ्यासाठी देवाची पूजा करण्यासारखे आहे.या संस्थेमार्फत विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.”

कापूस वेचणीच्या यांत्रिकीकरणावर भर

शिवराजसिंह चौहान म्हणाले की, “या संस्थेत सध्या कापूस वेचणीच्या यांत्रिकीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कापूस शेती टिकवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सीआयआरसीओटी) ही अशी एकमेव संस्था आहे जी यांत्रिकरित्या वेचलेल्या कापसावर प्रक्रिया करण्याचे काम करते. यासाठी झाडे व यंत्रे यांत्रिक कापूस वेचणीसाठी अनुकूल बनवण्याची आवश्यकता आहे. या संस्थेच्या 100 वर्षांच्या पूर्णतेच्या निमित्ताने येथे पायलट प्लांट सुविधा उभारण्यात येणार आहे. याशिवाय, कापसाच्या जीनोमसाठी आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून ही संस्था विकसित करण्यासाठीही आवश्यक ती व्यवस्था केली जाईल.

कापूस व्यापारासाठी ट्रेसिबिलिटी प्रणाली विकसित करण्याचे महत्त्व

चौहान म्हणाले की, “कापसाच्या व्यापारासाठी ट्रेसिबिलिटी प्रणाली विकसित करणे खूप महत्त्वाचे आहे. भारतीय कापसाच्या निर्यातीसाठी नवीन ट्रेसिबिलिटी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी येथे सर्व आवश्यक सुविधा विकसित केल्या जातील आणि हा प्रयत्नही शेतकऱ्यांसाठीच आहे.”

शेतकऱ्यांसाठी स्वस्त दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

चौहान यांनी कापसाच्या बियाण्यांच्या उच्च किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. “खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना अत्यंत उच्च किमतीत बियाणे विकतात.आयसीएआर ने याकडे लक्ष द्यावे की शेतकऱ्यांना कमी किमतीत दर्जेदार बियाणे मिळतील. तसेच त्यांनी शेतकऱ्यांकडेही लक्ष द्यावे जेणेकरून त्यांना कापसाच्या शेतीतून फायदा मिळेल आणि शेतीतून उदरनिर्वाह करता येईल,” असे ते म्हणाले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …