उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली.
“उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेला रस्ता अपघात मनाला व्यथित करणारा आहे. त्यामध्ये अनेकजणांनी आपल्या कुटुंबियांना गमावले आहे. ईश्वराकडे प्रार्थना करतो की, या कुटुंबांना हे अपार दुःख सहन करण्याची ताकद मिळावी. त्याचबरोबर, सर्व जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी इच्छा मी व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना सर्व प्रकारे मदत करण्यासाठी कार्यरत आहे-पंतप्रधान @narendramodi,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.