भारतीय नौदल यावर्षी नौदल दिनी (4 डिसेंबर) ओदिशा येथील पुरी स्थित ब्लू फ्लॅग बीच येथे होणाऱ्या ‘ऑपरेशनल डेमोंस्ट्रेशन’ (ऑप डेमो) मध्ये आपली जबरदस्त सागरी क्षमता आणि परिचालन सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास संमती दिली आहे. हा कार्यक्रम नौदलाच्या बहुआयामी क्षमतांचे दर्शन घडवतो , नागरिकांमध्ये सागरी जागरूकता वाढवतो आणि भारताच्या समृद्ध सागरी वारशाचा गौरव करतो.
नितळ ब्लू फ्लॅग बीचच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणारा 2024 ऑप डेमो, भारतीय नौदल आणि ओदिशा राज्याचा सागरी वारसा यांच्यातील संबंधाचे प्रतीक आहे.
कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी भारतीय नौदल , ओदिशा राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांसोबत एकत्रितपणे काम करत आहे. स्थानिक प्रेक्षक आणि पर्यटकांसाठी आसन व्यवस्था केली जाईल आणि प्रत्येकाला समुद्रकिनाऱ्यावरून थेट प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले जाईल आणि भारतीय नौदलाच्या यूट्यूब चॅनेलद्वारे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे प्रक्षेपण केले जाईल.