गुरुवार, नवंबर 14 2024 | 10:17:37 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / राष्ट्रपतींनी सिल्वासा येथे स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे केले उद्घाटन आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला केले संबोधित

राष्ट्रपतींनी सिल्वासा येथे स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे केले उद्घाटन आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला केले संबोधित

Follow us on:

राष्ट्रपती द्रौपदी  मुर्मू यांनी आज (13 नोव्हेंबर 2024) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव मधील सिल्वासा येथे स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, झंडा चौक चे उद्घाटन केले आणि  एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवच्या जनतेने त्यांचे ज्या आपुलकीने स्वागत केले ते कायम त्यांच्या स्मरणात राहील.  त्यांनी  या स्वागताबद्दल केंद्रशासित प्रदेशातील लोकांचे आभार मानले.

   

झंडा चौक शाळेचे उद्घाटन करताना आनंद झाल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर  प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्यासाठी 2018 मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि 2022 मध्ये एनआयएफटी ची स्थापना करण्यात आली. या प्रयत्नांमुळे केंद्रशासित प्रदेशातील युवकांना  मोठी संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या  की, या प्रदेशाला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे. त्यामुळे दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव ही उत्तम पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी  आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, पर्यटनाच्या विस्तारामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. वेगवेगळ्या प्रांतातील  लोकांशी भेट आपल्याला अधिक उदार आणि संवेदनशील बनवते.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

“कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी” केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण’ कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल …