एकात्मिक संरक्षण दलाच्या मुख्यालयामध्ये संरक्षण अंतराळ संस्थेतर्फे 11 ते 13 नोव्हेंबर 2024 दरम्यान ‘स्पेस टेबल टॉप एक्झरसाइज’ या अंतर्गत अंतराळ अभ्यास-2024 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. अंतराळ युद्धाच्या क्षेत्रात भारतीय सशस्त्र दलांच्या सामरिक तयारीला बळ देण्याच्या उद्देशाने हा अभ्यास एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा अग्रगण्य कार्यक्रम भारताच्या अंतराळ आधारित कार्यक्षमतांना बळकट करण्यासाठी तसेच अंतराळ सुरक्षेसाठी तिन्ही सेवांचे एकत्रीकरण वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले
सरावाच्या/ अभ्यासाच्या प्रमुख घटकांमध्ये उदयोन्मुख अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमांवर केंद्रित चर्चा करण्यात आली. या चर्चेत महत्त्वपूर्ण अंतराळ विषयक महत्वाच्या बाबींचे निरीक्षण आणि संरक्षणासह वाढत्या स्पर्धात्मक अंतराळाच्या क्षेत्रात परिस्थितीजन्य जागरूकता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अंतरिक्ष अभ्यास 2024 ने ‘इंटरऑपरेबिलिटी’ सुधारणे (विविध स्तरावरील माहितीचा वापर), परस्पर सामंजस्य वाढवणे आणि तिन्ही सेवा यांसह संरक्षण अंतराळ संस्था यांच्यातील सामंजस्य वाढवणे ही उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली.