सोमवार, जनवरी 06 2025 | 05:11:28 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / केंद्राने भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘ई-दाखिल’ केले सुरू

केंद्राने भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘ई-दाखिल’ केले सुरू

Follow us on:

आता भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कार्यरत असलेल्या ई-दाखिल पोर्टलची यशस्वी राष्ट्रव्यापी अंमलबजावणी सुरू करण्‍यात आली आहे.हे कार्य करून  ग्राहक व्‍यवहार खात्याने एक मैलाचा दगड  म्हणता येईल असा टप्‍पा पार पाडला  आहे, त्‍याचा  ग्राहक आयोग आणि ग्राहक व्यवहार विभागाला अभिमान वाटतो. 22 नोव्हेंबर 2024 रोजी लडाखमध्ये अलीकडेच ई-दाखिल पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे ई-दाखिल हा खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतामध्‍ये कार्यरत असलेला उपक्रम बनला आहे.

 

ग्राहकांसाठी परिणामकारक ठरतील अशा  नवीन आणि उदयोन्मुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी, ग्राहक संरक्षण कायदा 2019, अधिसूचित करण्यात आला आणि 20 जुलै 2020 रोजी लागू करण्यात आला. कोविड-19 मुळे ग्राहकांवरील निर्बंधांना सामोरे जाताना, ‘ई-दाखिल पोर्टल’ स्वस्त, वेगवान  म्हणून सादर करण्यात आले. ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी ही  मोफत यंत्रणा आहे.ई-दाखिल म्हणजे ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेला एक नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. यामुळे  ग्राहकांना संबंधित ग्राहक मंचाशी संपर्क साधण्यासाठी एक कार्यक्षम आणि सोयीस्कर मार्ग प्रदान झाला आहे.त्यांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी प्रवास करण्याची आणि प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता आता राहिली नाही. सुरुवातीपासूनच, ई-दाखिल ग्राहकांच्या हक्कांना चालना देण्यासाठी आणि वेळेवर न्याय सुनिश्चित करण्यासाठी एक ‘गेम चेंजर’ बनले  आहे.

ई -दाखिल पोर्टलवर वापरकर्त्याला आपली तक्रार दाखल करण्‍याची सुविधा सुलभतेने प्रदान केली आहे. त्‍यामुळे ग्राहकांना कमीतकमी प्रयत्नात तक्रारी नोंदवता येतात. तक्रारी दाखल करण्यापासून ते त्यांच्या स्थितीचा मागोवा घेण्यापर्यंत, ई-दाखिल प्रकरणे दाखल करण्याच्या संदर्भात पेपरलेस आणि पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करते. कोणताही ग्राहक किंवा वकील त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल  फोनवर ओटीपी  किंवा त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सक्रियकरणाची  लिंक प्राप्त करून आवश्यक प्रमाणीकरणासह ई-दाखिल प्लॅटफॉर्मवर ‘साइन अप’  करू शकतो. त्यानंतर ते तक्रार दाखल करून पुढे जाऊ शकतात. पोर्टलने सर्व पीडित ग्राहकांना त्यांच्या स्वत:च्या घरात राहून ग्राहक आयोगाकडे तक्रारी ऑनलाईन सादर करण्याची, योग्य शुल्क भरण्याची आणि प्रकरणाच्या प्रगतीचा ऑनलाईन मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ई-दाखिल पोर्टल प्रथम 7 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने सुरू केले. 2023 च्या अखेरीस, हे लडाख वगळता 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आले. आता, लडाखचे नायब राज्यपाल  ब्रिगेडियर. (डॉ.) बी.डी. मिश्रा (सेवानिवृत्त) यांनी 22 नोव्हेंबर 2024 रोजी लडाख ग्राहक आयोगामध्ये ई-दखिल पोर्टल लाँच केले, हे व्यासपीठ महानगरांपासून दुर्गम भागांपर्यंत भारतातील सर्व क्षेत्रांतील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

सध्या ई-दाखिल पोर्टलवर 2,81,024 हून अधिक वापरकर्त्यांनी नोंदणी केली आहे आणि 1,98,725 प्रकरणे दाखल करण्यात आली असून त्यापैकी 38,453 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत आणि आता ई-दाखिलचा आवाका देशव्यापी झाल्‍यामुळेख्‍ संपूर्ण  भारतातील ग्राहक हक्कांच्या परिघामध्ये क्रांती घडवून आणणे शक्य होणार आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …