लोड हो रहा है...

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकार प्राप्त समितीने परदेशात संकटात असलेल्या भारतीय महिलांसाठी 9 वन स्टॉप सेंटरसाठीच्या प्रस्तावांना दिली मंजुरी

Saransh Kanaujia
Saransh Kanaujia - Editor
1 Min Read

परदेशात अडचणीत असलेल्या भारतीय महिलांसाठीच्या मदतीकरिता 9 वन स्टॉप सेंटरसाठी (ओएससीएस) परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रस्तावांना महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकार प्राप्त समितीने मंजुरी दिली आहे. यामध्ये बहारीन, कुवेत, ओमान, कुवैत, युएई, सौदी अरेबिया (जेद्दा आणि रियाध) येथील 7 वन स्टॉप सेंटरसाठी आश्रयगृहांची व्यवस्था आहे, तसेच टोरांटो आणि सिंगापूर येथील 2 वन स्टॉप सेंटरसाठी आश्रयगृहांची व्यवस्था नाही. परराष्ट्र मंत्रालयाने आता या 9 दुतावासांसाठी बजेट लाइन सुरू केली आहे.

भारतीय समुदाय कल्याण निधी(आयसीडब्ल्यूएफ) ची स्थापना परदेशातील सर्व भारतीय दूतावास आणि केंद्रामध्ये करण्यात आली आहे.ज्यायोगे हा निधी परदेशातील भारतीय नागरिकांसाठी विविध ऑन-साईट कल्याणकारी उपक्रमांच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठी वापरला जाईल. आयसीडब्ल्यूएफच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये 1 सप्टेंबर 2017 पासून व्यापकपणे सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित मार्गदर्शक तत्वांमुळे अडचणीत असलेल्या भारतीय नागरिकांसाठी त्यात ही विशेषतः महिलांसाठी, कल्याणकारी उपक्रमांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जी या निधीद्वारे पूर्ण करता येईल.

ही माहिती महिला आणि बालविकास राज्य मंत्री सावित्री ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

 

- Advertisement -

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

 

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

- Advertisement -

Related Post

Share This Article
Follow:
लेखक वर्ष 2011 से पत्रकारिता के क्षेत्र में सक्रिय हैं। अब तक वे इतिहास से जुड़ी चार पुस्तकों का लेखन कर चुके हैं—‘भारत : 1857 से 1957 इतिहास पर एक दृष्टि’, ‘भारत : 1885 से 1950 इतिहास पर एक दृष्टि’, ‘गाँधी जी की राजनीतिक यात्रा के कुछ पन्ने’ और ‘1857 का स्वतंत्रता समर – कारण से परिणाम तक’। पत्रकारिता के क्षेत्र में वे विशेष रूप से राजनीति, अर्थव्यवस्था, सामाजिक विषयों और आध्यात्म से जुड़े समाचारों एवं विषयों पर लेखन करते रहे हैं। वर्षों के पत्रकारिता अनुभव और विभिन्न विषयों पर निरंतर लेखन के माध्यम से उन्होंने समसामयिक घटनाओं के साथ-साथ ऐतिहासिक, सामाजिक और आध्यात्मिक विषयों को भी पाठकों तक पहुँचाने का प्रयास किया है।