केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ च्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब करून,दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. दहशतवादाच्या समस्येविरोधात ‘ संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन’ बाळगून समन्वयित कृती करण्यासाठी विविध हितधारकांदरम्यान योग्य ताळमेळ निर्माण करण्यावर या परिषदेचा मुख्य भर आहे. या परिषदेला राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, दहशतवाद प्रतिबंधाशी संबंधित केंद्रीय संस्था/ विभागांचे अधिकारी आणि कायदा, न्यायवैद्यक शास्त्र, तंत्रज्ञान इ.क्षेत्रांशी संबंधित तज्ञ उपस्थित राहणार आहेत.